Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कुकरमध्ये कोणती डाळ किती शिट्ट्यात शिजते, १-२ की ४? उन्हाळ्यात झटपट स्वयंपाकासाठी ४ टिप्स

कुकरमध्ये कोणती डाळ किती शिट्ट्यात शिजते, १-२ की ४? उन्हाळ्यात झटपट स्वयंपाकासाठी ४ टिप्स

Best way to cook dal in pressure cooker: Cooking time for Chana dal and Moong dal: हूया कोणती डाळ शिजवण्यासाठी किती वेळ लागतो, त्यासाठी किती शिट्ट्या करायला हव्यात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 20:00 IST2026-04-30T20:00:00+5:302026-04-30T20:00:02+5:30

Best way to cook dal in pressure cooker: Cooking time for Chana dal and Moong dal: हूया कोणती डाळ शिजवण्यासाठी किती वेळ लागतो, त्यासाठी किती शिट्ट्या करायला हव्यात.

How many whistles for different types of dal Toor dal cooking time in pressure cooker Quick cooking tips for summer in Marathi | कुकरमध्ये कोणती डाळ किती शिट्ट्यात शिजते, १-२ की ४? उन्हाळ्यात झटपट स्वयंपाकासाठी ४ टिप्स

कुकरमध्ये कोणती डाळ किती शिट्ट्यात शिजते, १-२ की ४? उन्हाळ्यात झटपट स्वयंपाकासाठी ४ टिप्स

 घरच्या जेवणात जरी डाळ हा पदार्थ नेहमीचा असला तरी अनेकदा तिची चव बिघडते. भारतीय ताटात वरण-भात किंवा डाळ तडक्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. डाळीचे देखील विविध प्रकार आहेत. साधे वरण, डाळ तडका, डाळ फ्राय, आमसूल घालून केलेले वरण अशा अनेक प्रकारच्या डाळीची चव आपण कधी ना कधी चाखली असेलच.(Cooking tips) प्रत्येक भागात डाळ बनवण्याची पद्धत वेगळी असली तर शिजवण्याचे माध्यम एकच असते.  ते म्हणजे कुकर.अनेकदा गृहिणींना प्रश्न पडतो की, डाळ कधी कच्ची राहते तर कधी तिचे पूर्ण पीठ होऊन जाते. डाळ जास्त शिजली तर तिची मूळ चव निघून जाते आणि कमी शिजली तर ती पचायला जड जाते.(Best way to cook dal in pressure cooker)
उन्हाळ्याच्या दिवसात तर किचनमध्ये जास्त वेळ उभं राहणे कठीण असते, अशा वेळी कोणत्या डाळीला कुकरच्या किती शिट्ट्या हव्यात, याचे अचूक ज्ञान असल्यास स्वयंपाक झटपट होतो.(Cooking time for Chana dal and Moong dal) डाळीचा प्रकार, तिची गुणवत्ता आणि शिजवण्याच्या पूर्वी आपण केलेल्या काही छोट्या कृती यावर कुकरच्या शिट्ट्यांचे प्रमाण अवलंबून असते. तूरडाळ, मूगडाळ आणि चणाडाळ या तिन्ही डाळी शिजवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. पाहूया कोणती डाळ शिजवण्यासाठी किती वेळ लागतो, त्यासाठी किती शिट्ट्या करायला हव्यात. 

स्ट्रीट फूड खा बिंधास्त-विसरा वजनवाढीची काळजी! ७ प्रकारचं चमचमीत स्ट्रीट फूड तुम्हाला ठेवतं फिट

1. डाळींनुसार शिट्ट्यांचे प्रमाण 

  • मूग डाळ ही सर्वात हलकी आणि लवकर शिजणारी आहे. यासाठी मध्यम आचेवर कुकरच्या १ ते २ शिट्ट्या मूग डाळीसाठी पुरेशा आहेत. 
  • रोजच्या वरणासाठी वापरली जाणारी तूरडाळ मऊ शिजण्यासाठी ३ ते ४ शिट्ट्या आवश्यक असतात. जर डाळ भिजवलेली असेल तर २ शिट्ट्यांमध्ये ती शिजते. 
  • चणाडाळ शिजायला सर्वात जास्त वेळ घेते. यासाठी किमान आपल्याला ५ ते ६ शिट्ट्या कराव्या लागतील. तर मसूर डाळ ही तूर डाळीपेक्षा थोडी लवकर शिजते, यासाठी २ ते ३ शिट्ट्या पुरेशा असतात. 

 

2. डाळ शिजवण्यापूर्वी किमान १५ ते २० मिनिटे स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळीतील फायटिक अॅसिड निघून जाते, ज्यामुळे गॅसचा त्रास होत नाही आणि डाळ कमी वेळात मऊ शिजते. 

3. अनेकदा डाळ शिजताना कुकरच्या शिट्टीवाटे पाणी बाहेर येते आणि गॅस खराब होतो. हे टाळण्यासाठी डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा तेल घाला. तेलामुळे पाण्याचा फेस वर येत नाही आणि कुकर स्वच्छ राहतो. 

4. डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण अचूक असणं गरजेचे आहे. साधारणपणे १ वाटी डाळीसाठी २ ते २.५ वाट्या पाणी वापरायला हवं. जास्त पाणी घातल्यास शिट्टीवाटे ते बाहेर येते, तर कमी पाणी घातल्यास डाळ जळण्याची शक्यता असते. 

Web Title : कुकर में दाल पकाने का समय और गर्मी के लिए झटपट खाना पकाने के टिप्स।

Web Summary : विभिन्न दालों के लिए अलग-अलग प्रेशर कुकर की सीटी की आवश्यकता होती है। मूंग को 1-2, तूर को 3-4 और चना को 5-6 सीटी चाहिए। दालों को भिगोने से गैस कम होती है। हल्दी और तेल मिलाने से फैलावट रुकती है। सही पानी का अनुपात प्रयोग करें।

Web Title : Pressure cooker dal timings and summer cooking tips for quick meals.

Web Summary : Different dals require different pressure cooker whistles. Moong needs 1-2, Toor 3-4, and Chana 5-6. Soaking dals reduces gas. Adding turmeric and oil prevents spillage. Use correct water ratio for perfect cooking.