Lokmat Sakhi >Food > तुम्ही फ्लॉवर कसा चिरता? शेफ कुणाल कपूर सांगतात फ्लॉवर चिरण्याची सोपी-झटपट पद्धत-पाहा..

तुम्ही फ्लॉवर कसा चिरता? शेफ कुणाल कपूर सांगतात फ्लॉवर चिरण्याची सोपी-झटपट पद्धत-पाहा..

Easy Trick to cut the cauliflower by Kunal kapoor : घाईच्या वेळात भराभर कामं करायची तर वापरायला हव्यात अशा सोप्या ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 10:01 AM2023-12-16T10:01:18+5:302023-12-16T10:05:01+5:30

Easy Trick to cut the cauliflower by Kunal kapoor : घाईच्या वेळात भराभर कामं करायची तर वापरायला हव्यात अशा सोप्या ट्रिक्स...

Easy Trick to cut the cauliflower by Kunal kapoor : How do you cut flower cabbage ? Check out Chef Kunal Kapoor's easy-quick method of chopping flower cabbage | तुम्ही फ्लॉवर कसा चिरता? शेफ कुणाल कपूर सांगतात फ्लॉवर चिरण्याची सोपी-झटपट पद्धत-पाहा..

तुम्ही फ्लॉवर कसा चिरता? शेफ कुणाल कपूर सांगतात फ्लॉवर चिरण्याची सोपी-झटपट पद्धत-पाहा..

फ्लॉवर ही अनेकांची आवडती भाजी फ्लॉवरचा कधी रस्सा करतो तर कधी परतून मटार फ्लॉवर करतो. इतकंच नाही तर कधी आपण फ्लॉवरची भजीही करतो. पुलाव, मसालेभात, दलिया यांमध्येही फ्लॉवर घालतो. फ्लॉवरमध्ये अनेकदा अळ्या किंवा बारीक किडे असण्याची शक्यता असल्याने फ्लॉवर नीट पाहून चिरावा लागतो. इतकंच नाही तर फ्लॉवरच्या पुढची फुलं लहान असल्याने चिरताना ती तुटण्याची आणि त्याचा भुगा होण्याची शक्यता असते (Easy Trick to cut the cauliflower by Kunal kapoor) . 

खूप बारीक चिरला तरी फ्लॉवर गाळ शिजतो आणि मोठा चिरला तर तो खाता येत नाही. म्हणून फ्लॉवर योग्य त्या आकारातच चिरावा लागतो. घाईच्या वेळात भराभर कामं करायची असतील तर अशावेळी फ्लॉवर चिरण्यात जास्त वेळ जातो. असे होऊ नये म्हणून प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर फ्लॉवर चिरण्याची सोपी ट्रिक आपल्यासोबत शेअर करतात. यामुळे आपला वेळ तर वाचतोच आणि कामही परफेक्ट होतं. पाहूयात ही ट्रिक कोणती...

(Image : Google)
(Image : Google)

१. सगळ्यात आधी फ्लॉवरच्या बाहेर असलेल्या शेंड्या आणि पाने काढून घ्यायची. 

२. त्यानंतर राहणारा मोठा जाड दांडा कापायचा. 

३. मागच्या दांड्याला सुरीने मध्यभागी छेद दिल्यानंतर हाताने फ्लॉवरचे २ भाग होतात. 

४. त्याच पद्धतीने या २ भागांचे पुन्हा २ म्हणजे एकूण ४ भाग करायचे. 

५. मग फ्लॉवरची लहान लहान फुलं सुरीने कापायची. 

६. यामुळे फ्लॉवरचे तुकडे न होता तो नीट कापला जातो आणि वायाही जात नाही. यामुळे वेळही वाचतो आणि काम सोपे होते. 

Web Title: Easy Trick to cut the cauliflower by Kunal kapoor : How do you cut flower cabbage ? Check out Chef Kunal Kapoor's easy-quick method of chopping flower cabbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.