Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताकातला पालक म्हणजे अस्सल पारंपरिक चव, करा ताकातली पालकाची भाजी-नेहमीपेक्षा जास्त खमंग आणि पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2026 16:31 IST

Food And Recipe: पालकाची भाजी तुम्ही नेहमीच करून खात असाल पण आता मात्र थोडी वेगळ्या पद्धतीने ही भाजी ट्राय करून पाहा..(how to make spinach sabji with curd?)

ठळक मुद्देताकातली पालकाची भाजी नेमकी करायची कशी याची ही रेसिपी..

हिवाळा म्हटलं की हिरव्यागार पालेभाज्यांचा ऋतू. या दिवसांत बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या मिळतात आणि त्या ही नेहमीपेक्षा खूपच फ्रेश आणि चवदार असतात. या सगळ्या हिरव्यागार भाज्या पाहिल्या की त्या घेण्याचा आणि त्यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ करून खाण्याचा मोह खवय्यांना आवरत नाही. म्हणूनच आता पालकाच्या भाजीची ही एक पारंपरिक रेसिपी पाहा.. पालकाची भाजी करण्याची रेसिपी प्रत्येकाचीच वेगवेगळी असते. अशीच ही एक रेसिपी..(takatali palak bhaji recipe) यामध्ये पालकाच्या भाजीसाठी ताकाचा वापर करण्यात आला आहे. ही ताकातली पालकाची भाजी नेमकी करायची कशी याची ही रेसिपी...(how to make spinach sabji with curd?)

ताकातली पालकाची भाजी करण्याची रेसिपी

 

साहित्य

निवडून स्वच्छ धुवून घेतलेला पालक

२ ते ३ लाल मिरच्या आणि ७ ते ८ लसूण पाकळ्या

फक्त १० रुपयांत घरीच करा बॉडी पॉलिशिंग, काळे पडलेले हात, पाय, मान, पाठ होईल उजळ

२ चमचे बेसन आणि १ चमचा शेंगदाणे

२ वाट्या ताक आणि चवीनुसार मीठ

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि हळद

कृती

 

सगळ्यात आधी तर पालक स्वच्छ धुवून घ्या. यानंतर तो कुकरमध्ये थोडं पाणी घालून शिजवून घ्या. पालक शिजवत असतानाच दुसऱ्या भांड्यामध्ये शेंगदाणे घाला आणि ते देखील उकडून घ्या.

उकडून घेतलेला पालक थंड झाल्यावर फेटून एकजीव करून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं बेसन घाला आणि सगळं एकजीव करून घ्या.

लग्नात घालायला मोत्याचा साज! तन्मणी, चिंचपेटीचे सुंदर प्रकार, पारंपरिक दागिन्यांमध्ये करा थाट...

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये लसूणाची फोडणी घाला आणि नंतर शिजवलेला पालक, उकडलेले शेंगदाणे घालून भरपूर ताक घालून भाजी शिजवून घ्या. नंतर पुन्हा वरून लाल मिरच्यांची फोडणी, चवीनुसार मीठ घालून वाफ आली की ताकातली पातळ भाजी झाली तयार. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सभाज्या