मराठमोळी.. साज तिचा भारी! प्रत्येक मराठी महिलेलच्या गळ्यात शोभून दिसणाऱ्या तन्मणी- चिंचपेटीचे सुंदर डिझाइन्स
Updated:January 24, 2026 16:25 IST2026-01-24T14:45:46+5:302026-01-24T16:25:47+5:30

लग्नसराईच्या दिवसांत असे मोत्याचे पारंपरिक दागिने गळ्यात खूप सुंदर दिसतात.(pearl chinchpeti and tanmani designs)
या तन्मणी प्रकारात सध्या कित्येक डिझाईन्स मिळत आहेत.(beautiful designs of pearl chinchpeti and tanmani)
मोत्याचे तन्मणी नको असतील तर असे सोनेरी मण्यांचे तन्मणीही तुम्ही घेऊ शकता.
गळ्यालगत असणारा तन्मणी आवडत नसेल तर असा मोठा लांब तन्मणीही घेऊ शकता.
३ खड्यांचा, ५ खड्यांचा, ७ खड्यांचा असे वेगवेगळे प्रकार तन्मणी या दागिन्यामध्ये मिळतात.
या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांनाच ते शोभून दिसतात.
अशा प्रकारची चिंचपेटी गळ्यात घातली तर अगदी गळाभरून दिसते. मग इतर कोणत्याच दागिन्याची गरज पडत नाही.
चिंचपेटीचे असे कित्येक सुंदर प्रकार बाजारात मिळतात. किंवा तुम्ही ते ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.
सोन्यामध्येही हल्ली अशी चिंचपेटी तयार करून घेतात. मोती जास्त असल्याने त्याला खूप कमी सोने लागते..
चिंचपेटी गळ्यातल्याचा हा एक आणखी आकर्षक प्रकार पाहा..