lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > What Is A Faster Way To Fat Loss : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? मग झोपल्या झोपल्याच 'या' पद्धतीनं वजन घटवा

What Is A Faster Way To Fat Loss : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? मग झोपल्या झोपल्याच 'या' पद्धतीनं वजन घटवा

What Is A Faster Way To Fat Loss : जर तुमच्याकडे वर्कआऊट करण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल, तर डायटिंग न करता झोपून तुम्ही वजन कमी करू शकता. (5 Way To Lose Weight While Sleeping)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:29 PM2022-06-02T15:29:47+5:302022-06-02T15:55:49+5:30

What Is A Faster Way To Fat Loss : जर तुमच्याकडे वर्कआऊट करण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल, तर डायटिंग न करता झोपून तुम्ही वजन कमी करू शकता. (5 Way To Lose Weight While Sleeping)

What Is A Faster Way To Fat Loss : Weight Loss Tips 5 Way To Lose Weight While Sleeping | What Is A Faster Way To Fat Loss : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? मग झोपल्या झोपल्याच 'या' पद्धतीनं वजन घटवा

What Is A Faster Way To Fat Loss : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? मग झोपल्या झोपल्याच 'या' पद्धतीनं वजन घटवा

खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. बहुतेक लोकांचे वजन वाढते. लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा कोणालाही त्रास होऊ शकतो. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक वाढलेल्या वजनाने हैराण झाले आहेत. (Tips for Weight Lose) अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये घाम गाळतात, तर काही लोक आहारावर नियंत्रण ठेवू लागतात. (What Is A Faster Way To Fat Loss) जर तुमच्याकडे वर्कआऊट करण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल, तर डायटिंग न करता झोपून तुम्ही वजन कमी करू शकता. (5 Way To Lose Weight While Sleeping)

एका अहवालानुसार, जे लोक गाढ झोपतात त्यांचे वजन कमी होऊ शकते. झोपताना श्वास, घाम आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे व्यक्तीचे वजन ८३ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. हे प्रत्येक व्यक्तीच्या चयापचय दरावर अवलंबून असते. त्यामुळे झोपेने वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासाठी नित्यक्रमानुसार कसे झोपावे याबद्दल जाणून घ्या.

झोपण्याची योग्य वेळ

झोपेच्या अनियमिततेमुळे आणि चुकीच्या दिनचर्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत तुम्ही रोज ठराविक वेळी झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे शरीर एका विशिष्ट वेळी झोपण्यासाठी तयार होईल. सात ते आठ तास गाढ झोप घ्या. हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

आपलं हृदय आजारी पडतंय कसं ओळखाल? ४ वॉर्निंग साइन्स, हार्ट अटॅकचा धोका ओळखा

गाढ झोप घ्यावी

अनेक वेळा लोकांना झोप येते पण त्यांची झोप कोणत्या ना कोणत्या कारणाने मोडते. उदाहरणार्थ, खोलीत प्रकाश किंवा आवाज असल्यास, ते नीट झोपू शकत नाही. अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी तयारी करा जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल आणि गाढ झोप लागेल. त्यामुळे तुमचे वजन कमी होईल.

जेवल्यानंतर लगेच झोपू नका

अनेकदा लोक रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपण्यासाठी अंथरुणावर झोपतात. अशा परिस्थितीत पचनशक्तीवर परिणाम होतो आणि तुमचे अन्न पचत नाही. म्हणूनच तुम्ही झोपत असताना तुमची चयापचय क्रिया चांगल्या प्रकारे काम करत नाही. त्यामुळे जेवण केल्यानंतर दोन ते तीन तासांच्या आत झोपायला हवी.

झोपण्याआधी काय खाऊ नये

रात्रीचे हलके जेवण करा. कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. हलके अन्न खाल्ल्याने चयापचय वाढते आणि झोपताना कॅलरी बर्न होतात. झोपण्यापूर्वी चहा-कॉफी पिऊ नका.

थंड वातावरणात झोपा

जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा थंड तापमानात तुमची चयापचय क्रिया वाढते आणि तुम्ही विश्रांतीच्या वेळेपेक्षा जास्त कॅलरी बर्न करता येतात. थंड तापमानात झोपल्याने चांगल्या चरबीचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त रक्तातील साखरेपासून मुक्ती मिळते. त्यामुळे ब्लँकेट घेऊन झोपू नका.

Web Title: What Is A Faster Way To Fat Loss : Weight Loss Tips 5 Way To Lose Weight While Sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.