Lokmat Sakhi >Fitness > बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss : वेट लॉस ते पचनक्रिया सुधारणे; 'या' पद्धतीने बसणं ठरू शकतं आरोग्यासाठी फायदेशीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 03:02 PM2024-05-25T15:02:46+5:302024-05-26T10:14:43+5:30

Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss : वेट लॉस ते पचनक्रिया सुधारणे; 'या' पद्धतीने बसणं ठरू शकतं आरोग्यासाठी फायदेशीर..

Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss | बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे (Weight Loss). बॅड कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यासह इतर समस्या वजन वाढीमुळे निर्माण होतात (Vajrasana). मेन्टेन राहण्यासाठी वजन कमी करणं गरजेचं आहे. आपण वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो, किंवा चालायला जातो. काही जण सकाळी वॉकला जातात. तर, काही जण सायंकाळी शतपावली करतात (Fitness). वॉक केल्याने खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. पण वॉक करायला वेळ मिळत नसेल तर, बसून देखील आपण वजन कमी करू शकता. पण बसण्याची योग्य पद्धत आपल्याला ठाऊक असायला हवी. कोणत्या पोश्चरमध्ये बसल्याने वजन कमी होतं? किती वेळासाठी बसावं?

याची माहिती फिटनेस ट्रेनर प्रथमेश भोसले यांनी दिली आहे. त्यांच्या मते, 'जेवल्यानंतर वज्रासनमध्ये बसावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय स्नायूंना शक्ती मिळते. मुख्य म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. जे लोक तासनतास एकाच जागी बसून काम करतात, त्यांच्यासाठी वज्रासन फायदेशीर ठरतं. यामुळे बद्धकोष्ठता, पिंपल्स, पोटाचे विकार आणि स्ट्रेच मार्क्ससारख्या समस्या दूर होतात(Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss).'

वज्रासन करण्याचे फायदे

पचनसंस्थेसाठी उत्तम

चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

वज्रासन केल्याने आपल्या पचनसंस्थेला अनेक प्रकारे मदत होते. हे आपले पाय आणि मांड्यांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा आणते आणि ते पोटात वाढवते, त्यामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर होते. शिवाय पोटाचे अनेक विकार दूर होतात.

पाठदुखीपासून आराम

वज्रासन केल्याने पाठीच्या खालच्या स्नायूंना बळकट होण्यास मदत होते, त्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो.

संधिवाताच्या दुखण्यापासून आराम

वज्रासन केल्याने मांडीच्या आणि पायाच्या स्नायूंची लवचिकता वाढण्यास मदत होते. तसेच आपल्या नितंब, गुडघे आणि घोट्याच्या आसपासचे स्नायू देखील मजबूत होतात. जे संधिवाताच्या वेदनापासून मुक्त होण्यास मदत करते.

मानसिक आरोग्य सुधारते

ध्यानाचा सराव करण्यासाठी वज्रासन हे उत्तम आसन आहे. या आसनात श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने आपले मन शांत होते. ज्यामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते.

हाय ब्लड प्रेशर कण्ट्रोलमध्ये येते

वज्रासनामुळे तणाव, रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे विविध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांपासून आपले संरक्षण होते.

झोप सुधारते

वज्रासन केल्याने आपल्याला शांतता मिळते आणि तणाव आणि चिंता कमी होते. त्यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.

योगाभ्यास म्हणजे रॉकेट, उशीरा शिकाल तर पस्तावाल! दिलजीत दोसांझ सांगतो, योगाभ्यास सुरु केला आणि..

लठ्ठपणा कमी होतो

वज्रासनामुळे आपली पचनशक्ती वाढते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. आपण नियमित जेवल्यानंतर निदान १५ मिनिटांसाठी वज्रासन करण्यास बसू शकता.

Web Title: Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.