Lokmat Sakhi >Fitness > चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : फिट राहायचं? मग बिझी शेड्यूलमधून मिनी वॉकसाठी थोडासा वेळ काढावाच लागेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 01:23 PM2024-05-24T13:23:18+5:302024-05-24T13:25:17+5:30

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : फिट राहायचं? मग बिझी शेड्यूलमधून मिनी वॉकसाठी थोडासा वेळ काढावाच लागेल..

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat | चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

दररोज चालणे, हे निरोगी राहण्याचं उत्तम मार्ग आहे (Weight Loss). फिट राहण्यासाठी हा खूप चांगला व्यायाम मानला जातो. मात्र, बिझी शेड्यूल आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही (Fitness). ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, वाढतं कोलेस्टेरॉल यासह इतर समस्या निर्माण होतात (Mini Walk). त्यामुळे वेळीच व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायला हवे.

जर आपल्या जिममध्ये जाऊन वर्कआउट करायला वेळ मिळत नसेल तर, चालणे हा उत्तम व्यायाम ठरू शकतो. पण वॉकिंग करण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ नाही. जर शरीरातील अतिरिक्त चरबी लवकर कमी करायची असेल तर, आजपासून मिनी वॉक करायला सुरुवात करा. पण मग मिनी वॉक नेमकं किती वेळासाठी करावं? यामुळे शरीराला कोणते फायदे मिळतात? मिनी वॉक नेमकं कधी करावं? पाहूयात(How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat).

गेली चपला खरेदीला, करते आहे ऑफिसची ऑनलाईन मीटिंग! पाहा ' असं ' कामाचं प्रेशर तुमच्यावर आहे का?

मिनी वॉक कधी करावं?

वेळेच्या अभावामुळे काहींना मॉर्निंग किंवा शतपावली करायाला वेळ मिळत नाही. अशावेळी आपण मिनी वॉकसाठी ५ ते १० मिनिटं नक्कीच काढू शकता. तुम्ही ऑफिसला पोहोचला असाल तर पार्किंगमधून आत जाईपर्यंत चालत जा. न्याहारीनंतर ५ किंवा १० मिनिटांसाठी वॉक करा.

मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

ऑफिसमध्ये कोणाचा कॉल आला तर, वॉक करीत कॉलवर बोला. ऑफिसमध्ये दर एक तासाने ५ मिनिटे चालण्यासाठी ब्रेक घ्या. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर ५ मिनिटांसाठी चाला.

मिनी वॉकमध्ये ब्रिस्क वॉक करायचं की..

मिनी वॉकद्वारे आठवड्यातून किमान १५० मिनिटे चालणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी किमान रोज १० मिनिटे एक्स्ट्रा चाला. सुरुवातीला ब्रिस्क वॉक करू नका. जस जसा आपण वेळ वाढवाल तस तसं चालण्याची स्पीड देखील वाढवा. ब्रिस्क वॉकमध्ये चालण्याचा प्रयत्न करा.

Web Title: How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.