lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > Fat loss tips : कियारासारखी परफेक्ट फिगर तुम्हालाही मिळेल; मग जीम, डाएट नाही आजपासून करा 'हे' ३ व्यायाम

Fat loss tips : कियारासारखी परफेक्ट फिगर तुम्हालाही मिळेल; मग जीम, डाएट नाही आजपासून करा 'हे' ३ व्यायाम

Fat loss tips : बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांची जीवनशैली, टोन्ड बॉडीसाठी चर्चेत असतात.  घरच्याघरी ३ वर्कआऊट्स करून तुम्ही टोन बॉडी मिळवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 03:32 PM2021-08-25T15:32:58+5:302021-08-25T15:35:36+5:30

Fat loss tips : बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांची जीवनशैली, टोन्ड बॉडीसाठी चर्चेत असतात.  घरच्याघरी ३ वर्कआऊट्स करून तुम्ही टोन बॉडी मिळवू शकता. 

Fat loss tips : kiara advani slim waist these exercises will help you get flat tummy | Fat loss tips : कियारासारखी परफेक्ट फिगर तुम्हालाही मिळेल; मग जीम, डाएट नाही आजपासून करा 'हे' ३ व्यायाम

Fat loss tips : कियारासारखी परफेक्ट फिगर तुम्हालाही मिळेल; मग जीम, डाएट नाही आजपासून करा 'हे' ३ व्यायाम

कमरेवर फॅट्स खूप लवकर जमा होतात. मांड्या, कंबर, हातांवरील फॅट्स कमी करण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणं गरजेचं असतं. मागच्या दीड वर्षात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या शरीराचा आकार पूर्णपणे बदलला. काहींना लॉकडाऊनचा उपयोग एक्स्ट्रा कॅलरीज कमी करण्यासाठी केला तर काही वजन वाढवण्यासाठी केला. अनेक महिलांसह पुरूषांचे शरीर सतत घरी बसल्यानं बेढब झालं.  सेलिब्रिटीं मात्र नेहमीच स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी खास मेहनत घेतात. बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांची जीवनशैली, टोन्ड बॉडीसाठी चर्चेत असतात.  घरच्याघरी ३ वर्कआऊट्स करून तुम्ही टोन बॉडी मिळवू शकता. 

1) टो टच (Toe touch)

हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ, ताठ उभं राहा नंतर हळूहळू खाली वाका. जसजसे तुम्ही खाली जाता तसतसे तुमचा मागचा भाग मागे खेचा. काही सेकंद या स्थितीत थांबा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. जर तुम्ही पहिल्यांदाच व्यायाम करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला वाकणे अवघड वाटेल, पण हळूहळू शरीर लवचिक होईल, जेणेकरून तुम्ही सहज वाकू शकाल. तीनवेळा हा व्यायाम करा.

​2) ऑब्लिक क्रंच (Oblique crunch)

जर तुम्हाला शरीराला टोन करायचा असेल तर ​ऑब्लिक क्रंच हा खूप चांगला व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी, सर्वप्रथम योगा मॅटवर झोपा, आपला डावा पाय आणि उजवा हात वर घेण्याचा प्रय़त्न करा. नंतर उजवा हात आणि हावा पाय वर घ्या. आपल्या हातांनी पायांना आधार द्या. आता हळू हळू परत त्याच स्थितीत या. सुरूवाताीला हा व्यायाम फक्त  ५ वेळा करा. जेव्हा तुम्हाला याची सवय होईल तेव्हा हा व्यायामप्रकार ५ वेळा करू शकता. 

3) प्लँक  (Plank)

या व्यायामामुळे तुमचे हात, पाय आणि पोटांवर दबाव येतो. शरीर लवचिक करण्यासाठी प्रत्येक मुलीने हा व्यायाम करणे आवश्यक आहे. प्लँकच्या अवस्थेत यावं. म्हणजे पालथ झोपून दोन्ही हातांवर बळ देत उठावं. त्याच अवस्थेत राहावं. पहिले डावा पाय बाजूला न्यावा मग तो जागेवर ठेवून उजवा पाय बाजूला न्यावा. त्याला साइड किक करणं म्हणतात. हा व्यायाम करताना नितंबावर भार पडणार नाही याची काळजी घ्यावी. हा व्यायाम सलग एक मिनिट करावा.  जवळपास ४ ते ५ वेळा हा व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करा. 

Web Title: Fat loss tips : kiara advani slim waist these exercises will help you get flat tummy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.