Lokmat Sakhi >Fitness > जबरदस्त व्हायरल होत आहे मीरा राजपूतचा वर्कआऊट सेल्फी, प्रचंड फुडी तरी राखते फिटनेस..

जबरदस्त व्हायरल होत आहे मीरा राजपूतचा वर्कआऊट सेल्फी, प्रचंड फुडी तरी राखते फिटनेस..

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत कपूर तिच्या फिटनेसप्रेमाबद्दल प्रसिद्ध आहे. फिटनेस जपणे तिला मनापासून आवडत असून सोशल मिडियावरही ती याबाबत अतिशय ॲक्टीव्ह असते. तिने नुकताच तिचा एक वर्कआऊट सेल्फी सोशल मिडियावर शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 08:02 PM2021-07-04T20:02:16+5:302021-07-04T20:02:37+5:30

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत कपूर तिच्या फिटनेसप्रेमाबद्दल प्रसिद्ध आहे. फिटनेस जपणे तिला मनापासून आवडत असून सोशल मिडियावरही ती याबाबत अतिशय ॲक्टीव्ह असते. तिने नुकताच तिचा एक वर्कआऊट सेल्फी सोशल मिडियावर शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Bollywood actor Shahid Kapoor's wife Mira Rajput's fitness and workout selfie | जबरदस्त व्हायरल होत आहे मीरा राजपूतचा वर्कआऊट सेल्फी, प्रचंड फुडी तरी राखते फिटनेस..

जबरदस्त व्हायरल होत आहे मीरा राजपूतचा वर्कआऊट सेल्फी, प्रचंड फुडी तरी राखते फिटनेस..

Highlights तेलकट, तुपकट, गोड, स्पाईसी पदार्थ जर खाणं झाले तर दुसऱ्यादिवशी डबल एक्सरसाईज करा आणि खाण्यावर कंट्रोल ठेवा.

मीरा राजपूत सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. सोशल मिडियावर ती कायम तिचे फिटनेसचे फोटो  देखील शेअर करत असते. तिचे हे फोटो प्रत्येकासाठीच मोटीव्हेशन देणारे असतात. फिटनेसप्रेमी असूनही मीरा खाण्याची प्रचंड शौकिन आहे. विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद ती अतिशय मनापासून घेते, हे देखील तिच्या काही पोस्टवरून दिसून येते. एकीकडे फिटनेसची जबरदस्त क्रेझ आणि दुसरीकडे प्रचंड फुडी हा बॅलेन्स मीराला कसा सांभाळता येतो, हा प्रश्न मात्र तिच्या चाहत्यांना नेहमीच पडत असतो.

 

मीरा राजपूत कपूरने इन्स्टाग्रामवर नुकताच एक वर्कआऊट सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये ती अतिशय फिट आणि स्टनिंग दिसत आहे. या फोटाेला अटॅच पोस्ट टाकून तिने तुम्ही स्ट्रेचिंग केलंय का, असा प्रश्नही तिने विचारला आहे. तसेच तिने एक दुसरा सेल्फीही शेअर केला असून #sohfit21daychallenge असा टॅग दिला आहे. 

 

फुडी असूनही कसा जपायचा फिटनेस ?  
हा प्रश्न अनेक जणांना नेहमीच पडलेला असतो. फिटनेस राखायचा म्हणजे सगळे आवडीचे पदार्थ खाणे सोडून द्यायचे, या विचारानेच अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण रेग्युलर एक्सरसाईज करत असाल आणि आवडीचे पदार्थ महिन्यातून एक- दोनदा आणि ते ही योग्य प्रमाणात खात असाल, तर घाबरण्याची गरज नाही, असे आहारतज्ज्ञ सांगतात. तेलकट, तुपकट, गोड, स्पाईसी पदार्थ जर खाणं झाले तर दुसऱ्यादिवशी डबल एक्सरसाईज करा आणि खाण्यावर कंट्रोल ठेवा. तसेच जर तुम्हाला माहिती असेल की रात्री आपले खूप जेवण होणार आहे, तर अशा वेळी सकाळच्या जेवणावर नियंत्रण ठेवावे आणि रात्री जेवणाचा आस्वाद घ्यावा. असे केले तर निश्चितच फुडी असूनही फिटनेस सांभाळता येतो. 

Web Title: Bollywood actor Shahid Kapoor's wife Mira Rajput's fitness and workout selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.