Lokmat Sakhi >Fitness > फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

20-Minute Walking Workout : व्यायाम करायला वेळ नाही? स्वतःसाठी काढा फक्त २० मिनिटे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 03:30 PM2023-10-09T15:30:45+5:302023-10-09T15:31:53+5:30

20-Minute Walking Workout : व्यायाम करायला वेळ नाही? स्वतःसाठी काढा फक्त २० मिनिटे..

20-Minute Walking Workout | फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक लोकं विविध उपाय अवलंबून पाहतात. मॉर्निंग वॉक (Morning Walk), जिम, योगासने, डाएट यासह बऱ्याच गोष्टी करतात. ज्यामुळे वजन तर कमी होतेच, शिवाय आरोग्य देखील सुदृढ राहते. पण काही वेळेस या सगळ्या गोष्टी करूनही वजन कमी होत नाही. अशा वेळी वजन कमी करण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडतो.

काहींना बिझी शेड्युलमधूनही वेळ काढायला मिळत नाही. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि हेवी वर्कआउट करायचं नसेल तर, दिवसातून फक्त इतके पाऊलं चाला. फिट आणि हेल्दी राहण्यासाठी दिवसातून किती पावलं चालणे गरजेचं आहे? यामुळे शरीरात काय बदल घडतात? निरोगी राहण्याचा फॉर्मूला काय पाहा(20-Minute Walking Workout).

वेबएमडी या वेबसाईटनुसार, 'सकाळी उपाशीपोटी मॉर्निंग वॉक करण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठून ३० मिनिटे चालल्याने स्ट्रेस, नैराश्य, अनिद्रा, पचन समस्या, यासह लठ्ठपणाच्या त्रासापासून आराम मिळतो.'

हिरोईनसारखी किलर ३४-२४-३६ फिगर हवी? मग घरीच करा ५ सोपे व्यायाम, व्हा फिट आणि सुंदरही

निरोगी राहण्यासाठी चाला इतके पावलं

- चालणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. दिवसातून अर्धा तास जरी चाललात तरी देखील आरोग्यावर सकारात्मक बदल दिसून येतात.

- नियमित १० हजार पावलं चालल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. यासह मानसिक, शारीरिकदृष्ट्याही मजबूत होते.

- दिवसाची सुरुवात चालण्याने केल्याने दिवसभर उत्साहित आणि सकारात्मक वाटते. शिवाय वजम देखील कमी होण्यास मदत होते.

- रोज मॉर्निंग वॉक केल्याने हृदय, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनसंस्थेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

- जर आपले शेड्युल खूप बिझी असेल, सकाळी चालायला आपल्याला वेळ मिळत नसेल तर, संध्याकाळी अर्धा तास वॉक करा.

- जर आपण नियमित २० मिनिटे जरी चाललात तरी, देखील सकारात्मक बदल दिसून येईल. दिवसभरात काम करण्याची उर्जा तर मिळेलच शिवाय, पॉझिटिव्हिटी वाढेल.

Web Title: 20-Minute Walking Workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.