Lokmat Sakhi >Beauty > फेशिअल हेअर्स काढण्यासाठी हळदीत मिसळा 'सिक्रेट' पीठ आणि माती; त्वचा करेल ग्लो आणि..

फेशिअल हेअर्स काढण्यासाठी हळदीत मिसळा 'सिक्रेट' पीठ आणि माती; त्वचा करेल ग्लो आणि..

Turmeric for Hair Removal - healthy skin benefits : फेशिअल हेअर्स आणि टॅनिंग दूर करण्यासाठी चमचाभर हळदीत मिसळा २ गोष्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 04:30 PM2024-05-27T16:30:30+5:302024-05-27T16:35:01+5:30

Turmeric for Hair Removal - healthy skin benefits : फेशिअल हेअर्स आणि टॅनिंग दूर करण्यासाठी चमचाभर हळदीत मिसळा २ गोष्टी..

Turmeric for Hair Removal - healthy skin benefits | फेशिअल हेअर्स काढण्यासाठी हळदीत मिसळा 'सिक्रेट' पीठ आणि माती; त्वचा करेल ग्लो आणि..

फेशिअल हेअर्स काढण्यासाठी हळदीत मिसळा 'सिक्रेट' पीठ आणि माती; त्वचा करेल ग्लो आणि..

महिलांच्या चेहऱ्यावर अनेकदा लहान केस वाढतात (Turmeric). ज्यामुळे बऱ्याचदा चारचौघात लाजिरवाणे वाटते. या छोट्या छोट्या फेशियल केसांनी महिलांचे सौंदर्य बिघडते. अशा स्थितीत वॅक्सिंग, थ्रेडिंग किंवा रेझरचा वापर आपण करतो. पण या गोष्टींचा वापर केल्याने त्वचेला हानी पोहचू शकते (Skin care). जर आपल्याला ब्यूटी उत्पादनांचा वापर करायचं नसेल तर, नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून पाहा (Beauty tips).

हळदीत दोन गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा. या उपायामुळे काही मिनिटात फेशिअल हेअर्स गायब होतील. यासह डेड स्किन आणि टॅनिंग देखील दूर होईल. मुख्य म्हणजे या साहित्यातील घटकांमुळे त्वचेला फायदाच होईल(Turmeric for Hair Removal - healthy skin benefits).

हळदीत मिसळा २ गोष्टी फेशिअल हेअर्स होतील गायब

लागणारं साहित्य

हळद

तांदुळाचं पीठ

मुलतानी माती

पॅट कमिन्स सांगतो, आई म्हणाली होती, जा जगावर राज्य कर! आईचे निधन झाले आणि..

पाणी

दूध

अशा पद्धतीने तयार करा हेअर रिमुव्हल क्रीम

गॅसवर एक वाटी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तांदुळाचं पीठ, अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे पाणी घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

नंतर त्यात एक चमचा मुलतानी माती आणि दोन चमचे दूध घालून मिक्स करा. तयार पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर चेहऱ्यावर पेस्ट लावा. १० मिनिटानंतर उलट्या दिशेने पेस्ट काढा. यामुळे फेशिअल हेअर्स निघतील, शिवाय टॅनिंग देखील दूर होईल. नंतर त्वचा पाण्याने धुवून घ्या. या उपायाचा वापर स्किन क्लिन होईल.

स्किनसाठी हळदीचे फायदे

डॉलीला टक्कर देणारी 'हॉट चहावाली' नक्की कोण? तिची सोशल मीडियात इतकी चर्चा का?

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि अनेक पोषक घटक असतात. त्वचेवर हळद लावल्याने पिंपल्स, डाग, टॅनिंग आणि काळी वर्तुळाची समस्या दूर होते. शिवाय याचा वापर हेअर रिमुव्हलसाठीही होऊ शकतो. 

Web Title: Turmeric for Hair Removal - healthy skin benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.