Lokmat Sakhi >Social Viral > पॅट कमिन्स सांगतो, आई म्हणाली होती, जा जगावर राज्य कर! आईचे निधन झाले आणि..

पॅट कमिन्स सांगतो, आई म्हणाली होती, जा जगावर राज्य कर! आईचे निधन झाले आणि..

Pat Cummins fondly recalls mother’s inspiring words: Go and take on the world : 'माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता'; आईच्या निधनानंतर पॅट कमिन्स स्वतःला सावरू शकला नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 06:03 PM2024-05-26T18:03:51+5:302024-05-26T22:35:41+5:30

Pat Cummins fondly recalls mother’s inspiring words: Go and take on the world : 'माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता'; आईच्या निधनानंतर पॅट कमिन्स स्वतःला सावरू शकला नाही..

Pat Cummins fondly recalls mother’s inspiring words: Go and take on the world | पॅट कमिन्स सांगतो, आई म्हणाली होती, जा जगावर राज्य कर! आईचे निधन झाले आणि..

पॅट कमिन्स सांगतो, आई म्हणाली होती, जा जगावर राज्य कर! आईचे निधन झाले आणि..

आई म्हणजे सर्वस्व. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आई आपल्यात नसली तरी, तिने सांगितलेल्या गोष्टी, ती सोबत असलेली जाणीव वारंवार होत असते. अशीच आईची आठवण ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) यांनी शेअर केली आहे. त्याने आईने सांगितलेल्या काही गोष्टी आणि आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पॅट कमिन्सच्या आईने त्याला 'गो अँड टेक ऑन द वर्ल्ड' असं म्हटलं आहे. म्हणजेच, 'कोणत्याही आव्हानांना तू सामोरा जाऊ शकतोस (Mother's Love). एकंदरीत जगाचा ताबा घे.' अशा प्रेरणादायी शब्दात आईने पॅटला प्रेरित केलं. आईच्या शब्दातून पॅट प्रेरित कसा झाला, शिवाय आई गेल्यानंतरचा काळ त्याच्यासाठी किती कठीण होता हे त्याने भावनिक शब्दातून व्यक्त केलं(Pat Cummins fondly recalls mother’s inspiring words: Go and take on the world).

बाथरूमच्या टाईल्स मेणचट - टॉयलेटच्या पिवळट झाल्या? १० रुपयांची तुरटी वापरा, सोपा चकचकीत उपाय

...जा आणि दुनियावर राज्य कर..

पॅट कमिन्सच्या आईचं २०२३ साली दीर्घ आजाराने निधन झाले. ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर, निधनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत गंभीर झाली होती. तेव्हा पॅट टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. आईची तब्येत गंभीर होत असल्याने त्याने कुटुंबियांसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत स्टीव्हन स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती.

आपल्याला किती हुंडा मिळू शकतो? लोक ऑनलाईन वापरू लागले हुंडा कॅल्क्युलेटर..पाहा लग्नाचा बिझनेस..

टेस्ट डॉक्युमेण्ट्रीमध्ये पॅटने आईबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यावेळी आईने त्याला, 'पॅट जा आणि या जगाचा ताबा घे. कोणीतरी ही सुंदर गोष्ट नक्कीच करू शकेल, पण तू ही गोष्ट करू शकशील याची मला खात्री आहे.' असं म्हणत पॅटला प्रेरित केलं.

शिवाय आईच्या निधन होण्या आधीचा काळ किती कठीण होता, याबद्दल कमिन्सने इम्परफेक्ट पॉडकास्टवर काही गोष्टी शेअर केल्या आहेत, 'मी त्या विमानात चढत असताना मला माहित होते की मला दोन आठवड्यांत परत यावे लागेल. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता. १२ महिने मी या गोष्टी अनुभवत होतो. पण वेळेला देखील निश्चित काही मर्यादा आहेत. पण आई गेल्यानंतर घरात राहण्यापेक्षा मी खेळ खेळण्यास प्राधान्य देतो.'

पॅट कमिन्सच्या आईचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. २००५ मध्ये त्यांना पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. मात्र, १० मार्च २०२३  रोजी कॅप्टन पॅट कमिन्स याच्या आईचं निधन झालं. त्याने आईचं निधन झाल्यानंतर आईसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले. शिवाय 'मी तुझ्यावर फार प्रेम करतो. तु कायम मनात राहशील' असं भावूक कॅप्शन दिलं होतं. 

Web Title: Pat Cummins fondly recalls mother’s inspiring words: Go and take on the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.