Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कितीही शाम्पू करा, घामामुळे केस चिकट- चंपू दिसतात? ५ सोपे उपाय - अशी घ्या काळजी, केस राहतील दाट- मुलायम

कितीही शाम्पू करा, घामामुळे केस चिकट- चंपू दिसतात? ५ सोपे उपाय - अशी घ्या काळजी, केस राहतील दाट- मुलायम

Natural cleansers for sticky hair: Home remedies for oily hair and scalp: उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्याच्या ५ 'मॅजिकल' टिप्स पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 15:27 IST2026-05-11T15:26:22+5:302026-05-11T15:27:13+5:30

Natural cleansers for sticky hair: Home remedies for oily hair and scalp: उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्याच्या ५ 'मॅजिकल' टिप्स पाहूया.

Sticky hair after sweating home remedies Ayurvedic tips for oily scalp in summer Best hair care routine for sweaty hair How to keep hair bouncy and fresh in heat | कितीही शाम्पू करा, घामामुळे केस चिकट- चंपू दिसतात? ५ सोपे उपाय - अशी घ्या काळजी, केस राहतील दाट- मुलायम

कितीही शाम्पू करा, घामामुळे केस चिकट- चंपू दिसतात? ५ सोपे उपाय - अशी घ्या काळजी, केस राहतील दाट- मुलायम

उन्हाळ्यात घामामुळे आपली चिडचिड वाढते. केस ओले होतात, ज्यामुळे कितीही महागतला शाम्पू वापरला तरी केस चंपू दिसतात. केसांच्या मुळाशी साचणारा घाम आणि धूळ यामुळे टाळूवर संसर्ग होण्याचा धोका असतो.(Hair care tips) घामातील मिठामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात.(Natural cleansers for sticky hair) अनेकदा आपण केस स्वच्छ करण्यासाठी वारंवार शाम्पू करतो, पण यामुळे केसांचे अधिक नुकसानच होते. केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी आणि त्यांना दाट व मुलायम ठेवण्यासाठी फक्त शाम्पू करणं पुरेसं नसतं. तर रोजच्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे देखील गरजेचे आहे. (Home remedies for oily hair and scalp)
उन्हाळ्यात केसांच्या चिकटपणामुळे घराबाहेर निघताना अनेकांना वैताग येतो.(Summer hair detox at home) पण अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास केसांचे सौंदर्य टिकून राहिल. या उपायांमुळे आपले केस दाट आणि मजबूत होतात. उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्याच्या ५ 'मॅजिकल' टिप्स पाहूया. 

आरशात स्वतःला पाहून म्हणाल... 'वाह!' १ रुपयाही खर्च न करता करा ७ बदल - दिसाल अधिक तरुण- सुंदर

1. अनेकदा आपण ओले केस लगेच बांधण्याची घाई करतो. पण आयुर्वेदानुसार ही सवय केसांसाठी हानिकारक 
ठरु शकते. ओले केस जास्त वेळ बांधून ठेवल्याने टाळूमध्ये ओलावा आणि उष्णता अडकून राहते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि कोंडा वाढण्याची समस्या वाढते. 

2. उन्हाळ्यात टाळू तेलकट झाल्यावर सतत शाम्पूचा वापर केला जातो. पण अति शाम्पू केल्याने केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. आयुर्वेद केसांमधील उष्णता आतून शांत करण्यावर लक्ष केंद्रित करतो. यासाठी थंड आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक असते. 

3. उन्हाळ्यात शरीरातील पाणी लवकर कमी होते. याचा परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावरही होतो. आयुर्वेदानुसार आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात. यासाठी भिजवलेले काळे मनुके, खजूर, तीळ यांचे सेवन करणे आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. तसेच आहारात टरबूज, खरबूज आणि इतर हंगामी फळे खा. 

4. केसांसाठी भृंगराज, ब्राह्मी, शिकाकाई आणि आवळा यांसारख्या आयुर्वेदिक घटकांचा वापर करा. यामुळे केस मजबूत होतील. तसेच केसांतील कोंडा देखील कमी होईल. विशेषतः उन्हाळ्यात, या वनस्पती केसांचे आतून पोषण करतात.

5. दररोज रात्री उशिरापर्यंत जागे राहत असाल तर त्याचा परिणाम फक्त शरीराच्या थकव्यावरच नाही, केसांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. आयुर्वेदानुसार शरीराच्या दुरुस्तीसाठी रात्रीची चांगली झोप आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील पित्त वाढते. ज्यामुळे केस गळतात. यासाठी वेळेवर झोपणे देखील महत्त्वाचे आहे. 

6. आयुर्वेदानुसार सततचे बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्त हे देखील केस गळण्याचे कारण असू शकते. जेव्हा पचनक्रिया बिघडते, तेव्हा शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. याचा परिणाम हळूहळू आपल्या केसांवर होतो. आयुर्वेदानुसार केसांसाठी आपण लाकडी कंगाव्याचा देखील वापर करु शकतो. 


Web Title : इस गर्मी में चिपचिपे बालों को हराएं: स्वस्थ बालों के लिए सरल उपाय।

Web Summary : गर्मी में पसीना और गंदगी बालों को चिपचिपा बनाते हैं। आयुर्वेद गीले बालों को बांधने से बचने, शैम्पू को सीमित करने, मौसमी फलों के साथ हाइड्रेटेड रहने और आयुर्वेदिक सामग्री का उपयोग करने का सुझाव देता है। स्वस्थ, मजबूत बालों के लिए नींद को प्राथमिकता दें, कब्ज को दूर करें और लकड़ी की कंघी का उपयोग करें।

Web Title : Beat sticky hair this summer: Simple tips for healthy hair.

Web Summary : Sweat and grime make hair sticky in summer. Ayurveda suggests avoiding tying wet hair, limiting shampoo, staying hydrated with seasonal fruits, and using Ayurvedic ingredients. Prioritize sleep, address constipation, and use wooden combs for healthy, strong hair.