Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > तिशीनंतरही कायम राहणार चेहऱ्याचं सौंदर्य, फक्त ५ सोप्या टिप्स रोज फॉलो करा; ना जास्त खर्च ना मेहनत

तिशीनंतरही कायम राहणार चेहऱ्याचं सौंदर्य, फक्त ५ सोप्या टिप्स रोज फॉलो करा; ना जास्त खर्च ना मेहनत

Skin Care Tips : जर योग्य ती काळजी घेतली नाही तर कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. अशात नेहमीच तरूण दिसण्यासाठी आणि त्वचा चमकदार, टवटवीत ठेवण्यासाठी काही गोष्टी नियमितपणे फॉलो करू शकता.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 09:48 IST2026-04-19T09:45:19+5:302026-04-19T09:48:00+5:30

Skin Care Tips : जर योग्य ती काळजी घेतली नाही तर कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. अशात नेहमीच तरूण दिसण्यासाठी आणि त्वचा चमकदार, टवटवीत ठेवण्यासाठी काही गोष्टी नियमितपणे फॉलो करू शकता.  

Skin care routine after 30 to maintain face glow | तिशीनंतरही कायम राहणार चेहऱ्याचं सौंदर्य, फक्त ५ सोप्या टिप्स रोज फॉलो करा; ना जास्त खर्च ना मेहनत

तिशीनंतरही कायम राहणार चेहऱ्याचं सौंदर्य, फक्त ५ सोप्या टिप्स रोज फॉलो करा; ना जास्त खर्च ना मेहनत

Skin Care Tips : मुलायम, चमकदार, डाग नसलेला, टवटवीत आणि फ्रेश चेहरा सगळ्यांनाच हवा असतो. पण हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही की, वाढत्या वयासोबत चेहऱ्याचा ग्लो हळूहळू कमी होऊ लागतो. खासकरून वयाच्या तिशीनंतर त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या काळात त्वचेवरील नॅचरल ग्लो उडू लागतो. जर योग्य ती काळजी घेतली नाही तर कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. अशात नेहमीच तरूण दिसण्यासाठी आणि त्वचा चमकदार, टवटवीत ठेवण्यासाठी काही गोष्टी नियमितपणे फॉलो करू शकता.   

सनस्क्रीन विसरू नका  

सगळ्यात पहिलं काम तर हे करा की, घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावा. आधीपेक्षा आता सूर्याची किरणे अधिक प्रखर असतात. त्यामुळे त्वचेवर सनस्क्रीन न लावता बाहेर पडाल तर त्वचा काळवंडते. त्वचेवर काळे डाग दिसू लागतात. तसेच त्वचेतील ओलावा नष्ट होतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. अशात आपण SPF 50 आणि PA++++ असलेलं  सनस्क्रीन निवडा. जर आपण घरातच राहत असाल तरीही सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे.     

त्वचा हायड्रेट ठेवा 

ग्लोइंग स्किन त्वचेसाठी चेहरा हायड्रेट ठेवणं हा महत्वाचा मुद्दा ठरतो. जर त्वचेमध्ये ओलावा कमी असेल तर पाइन लाइन्स आणि सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायजरचा वापर करा, दिवसभर न विसरता भरपूर पाणी प्या, जेणेकरून त्वचा आतून हायड्रेट राहील.   

व्हिटामिन सी सीरम  

चुकीची लाइफस्टाईल, प्रदूषण आणि जास्त स्ट्रेस या गोष्टी आपल्या त्वचेच्या वैरी असतात. या गोष्टींमुळे कमी वयात आपण म्हातारे दिसू शकता. अशात हे अवेळी येणारं म्हातारपण रोखण्यासाठी दिवसा व्हिटामिन सी सीरम आणि रात्री नियासिनमाइड लावा.  

स्क्रब जास्त करू नका  

स्क्रबने चेहऱ्याची खोलवर स्वच्छता होते, त्वचेतील धूळ-माती निघून जाते. पण फायदे असले तरी प्रमाणापेक्षा जास्त स्क्रब करू नये. सोबतच असे प्रॉडक्ट वापरणे टाळा ज्यांचा जास्त सुगंध येतो, कारण त्यांनी त्वचा ड्राय होऊ शकते.   

आहार ठरतो महत्वाचा 

आता तुम्ही म्हणाल की, आपण काय खातो त्याचा आणि त्वचेचा काय संबंध? तर आपण जे खातो त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे अँटी-एजिंग डाएट भरपूर घ्या. यासाठी ओमेगा - ३ असलेला आहार घ्या. शक्य तेवढे साखर आणि दारूपासून दूर रहा. 

Web Title : तीस के बाद भी त्वचा रहेगी जवां, ये आसान टिप्स अपनाएं।

Web Summary : तीस के बाद त्वचा की अधिक देखभाल जरूरी है। रोजाना सनस्क्रीन लगाएं, हाइड्रेटेड रहें और विटामिन सी सीरम का उपयोग करें। ज्यादा स्क्रबिंग से बचें और ओमेगा-3 से भरपूर स्वस्थ आहार लें। बेहतर त्वचा के लिए चीनी और शराब सीमित करें।

Web Title : Maintain youthful skin after 30 with these simple daily tips.

Web Summary : After 30, skin needs extra care. Use sunscreen daily, hydrate well, and incorporate vitamin C serum. Avoid over-exfoliating and maintain a healthy diet rich in Omega-3 to retain a youthful glow. Limit sugar and alcohol for better skin health.