ऋतू कोणताही असो, त्वचेवर टॅनिंग, काळे डाग आणि डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येणे ही अगदी सामान्य समस्या बनली आहे. बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल ओतलेले फेसवॉश किंवा क्लींजर्स त्वचा स्वच्छ करतात. पण यात असणारे केमिकल्स त्वचेचे अधिक नुकसान करतात.(Skin care Tips) ज्यामुळे त्वचा निर्जीव आणि काळी पडू लागते. जर आपल्यालाही त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार, डागविरहित आणि 'ग्लास स्किन'सारखी (Glass Skin) बनवायची असेल, तर केमिकलच्या बाटल्या बाजूला ठेवा.(How to get clear and spotless skin at home)
आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी १० रुपयांच्या आपला त्वचा उजळवण्यास मदत करतील. इतकेच नाही तर हा फेसवॉश चेहऱ्यावरील टॅनिंग आणि डार्क सर्कल देखील कमी करेल. हा फेसवॉश घरच्या घरी कसा बनवायचा पाहूया. (Benefits of potato juice for dark spots)
हा फेसवॉश बनवण्यासाठी आपल्याला १ बटाटा, अर्धा टोमॅटो आणि १ ते २ चमचे ताजे दही लागेल. सगळ्यात आधी हा फेसवॉश तयार करण्यासाठी बटाटा स्वच्छ धुवून आणि सोलून घ्या. त्याचे छोटे तुकडे करुन मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या आणि त्याचा रस किंवा पेस्ट काढा. त्याचप्रमाणे अर्ध्या टोमॅटोचीही मिक्सरमध्ये गुळगुळीत प्युरी बनवून घ्या.
आता एका वाटीमध्ये २ चमचे बटाट्याचा रस आणि २ चमचे टोमॅटोची प्युरी एकत्र करा. या मिश्रणात १ ते २ चमचे ताजे दही घाला. चमच्याच्या सहाय्याने सर्व साहित्य एकजीव करा. होममेड, नॅचरल आणि केमिकलमुक्त 'ग्लास स्किन क्लींजर' फेसवॉश तयार होईल.
हा फेसवॉश चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने धुवा. नंतर सर्व मिश्रण चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती लावा. बोटांनी हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे चेहऱ्याचा मसाज करा. डार्क सर्कल्स असणाऱ्या ठिकाणी बोटांनी हलकी मालिश करा. मसाज झाल्यावर २ मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसवॉश नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल.
बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्स असतात. यात असणारे कॅटेकोलेज एन्झाइम चेहऱ्यावरील काळे डाग, पिग्मेंटेशन आणि डोळ्यांखालील काळे वर्तुळ कमी करण्यास मदत करतात. तर टोमॅटोमध्ये लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेवरील टॅनिंग काढून टाकते आणि त्वचेची छिद्र घट्ट करते. तर दही त्वचेला आतून मॉइश्चराईज करते.
