Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > वयापेक्षाही १० वर्षाने लहान दिसायचंय, ट्राय करून बघा 'हे' जपानी स्किनकेअर रूटीन; कमी खर्चातही होईल काम

वयापेक्षाही १० वर्षाने लहान दिसायचंय, ट्राय करून बघा 'हे' जपानी स्किनकेअर रूटीन; कमी खर्चातही होईल काम

Japanese Skin Care: जपानी महिलांसारखी स्वच्छ, मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तर कमी प्रॉडक्ट्स वापरूनही ती मिळू शकते. पाहुयात काय आहेत हे नियम.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:29 IST2026-04-24T11:26:19+5:302026-04-24T11:29:20+5:30

Japanese Skin Care: जपानी महिलांसारखी स्वच्छ, मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तर कमी प्रॉडक्ट्स वापरूनही ती मिळू शकते. पाहुयात काय आहेत हे नियम.

Japanese skincare routine for glowing and fresh face | वयापेक्षाही १० वर्षाने लहान दिसायचंय, ट्राय करून बघा 'हे' जपानी स्किनकेअर रूटीन; कमी खर्चातही होईल काम

वयापेक्षाही १० वर्षाने लहान दिसायचंय, ट्राय करून बघा 'हे' जपानी स्किनकेअर रूटीन; कमी खर्चातही होईल काम

Japanese Skin Care: त्वचेची काळजी घेण्यासाठी तरूणी किंवा महिला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. सामान्यपणे क्लींजर, टोनर, सीरम, क्रीम आणि सनस्क्रीन या गोष्टी सगळेच वापरतात. अनेकांचा समज असतो की, जेवढे जास्त प्रॉडक्ट लावाल, तेवढी त्वचा चांगली दिसेल. पण मुळात हा एक मोठा गैरसमज आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी जपानी महिला वेगळेच नियम फॉलो करतात. आपल्याला सुद्धा जपानी महिलांसारखी स्वच्छ, मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तर कमी गोष्टींमध्येही ती मिळू शकते. पाहुयात काय आहेत हे नियम.

डबल क्लींजिंग गरजेचं - दिवसभर उन्हात राहिल्याने चेहऱ्यावर घाम येणं, त्वचा तेलकट होणं कॉमन आहे. अशात त्वचा चांगली ठेवण्यासाठी डबल क्लींजिंग फार गरजेचं असतं. सगळ्यातआधी ऑइल बेस्ड क्लींजरने मेकअप काढा, नंतर फेसवॉशने त्वचा चांगली साफ करा.

ग्रीन टी - ग्रीन टी मध्ये आढळणारे अँटी-ऑक्सीडेंट त्वचेचं नुकसान टाळू शकतात आणि सूज कमी करू शकतात. आपण याचा वापर फेस मास्क, टोनर किंवा स्किनकेअर प्रॉडक्टच्या रूपात करू शकता. 

उन्हापासून बचाव - जपानमध्ये लोक सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. अशात जर आपल्याला त्वचा चांगली ठेवायची असेल, तर हलके आणि लवकर अब्जॉर्ब होणारे सनस्क्रीन वापरू शकता.

हलकं एक्सफोलिएशन - त्वचा ग्लोइंग, टवटवीत ठेवण्यासाठी डेड स्किन काढणं फार गरजेचं असतं. जर आपल्याला डेड स्किन दूर करायची असेल तर तांदूळ किंवा एंझाइम बेस्ड हलक्या स्क्रबचा वापर करू शकता. 

शीट मास्क - आठवड्यातून एक किंवा दोनदा शीट मास्कचा वापर करू शकता. याने त्वचा फ्रेश आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळू शकते. त्वचा चमकदार ठेवण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे.

Web Title : जापानी स्किनकेयर रूटीन: 10 साल जवां दिखें, किफायती!

Web Summary : जापानी महिलाएं चमकदार त्वचा के लिए डबल क्लींजिंग, ग्रीन टी, सनस्क्रीन, हल्के एक्सफोलिएशन और शीट मास्क का उपयोग करती हैं। यह सरल रूटीन युवा चमक का वादा करता है।

Web Title : Japanese Skincare Routine: Look 10 Years Younger, Affordably!

Web Summary : Japanese women use double cleansing, green tea, sunscreen, gentle exfoliation, and sheet masks for radiant skin. This simple routine promises a youthful glow.