पुर्वी वय झालं की केस पांढरे व्हायचे. पण आता मात्र वयाचा आणि केस पांढरे होण्याचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण तरुण वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण शाळकरी मुलांचेही केस आता पांढरे होत आहेत. इतक्या कमी वयात केस पांढरे झाले तर आजुबाजुची मुलं त्यांचा चिडवतात, त्यातून त्यांना ताण येतो. या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो. म्हणूनच तुमच्या मुलांच्या बाबतीत असं होत असेल तर लगेचच त्यामागची कारणं काय आणि काय उपाय करायला हवे ते पाहा...(Gray Hair Problems In Kids- Reasons and Remedies)
शाळकरी मुलांचे केस का पांढरे होत आहेत?
शाळकरी मुलांचे केस का पांढरे होत आहेत आणि त्यावर काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती डॉक्टरांनी wellnesswith_poonam या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कारणे पाहा...
१. आहारात व्हिटॅमिन बी ची कमतरता असते.
२. लोहयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाणे.
वजन जास्त असो किंवा कमी- नो टेन्शन...५ लक्षणं तुमच्यात दिसली तर तुम्ही आहात एकदम फिट ...
३. लहान वयातच मुलांना ताण असणे आणि पुरेशी झोप न घेणे
४. जंकफूड जास्त प्रमाणात घेणे आणि त्यासोबतच योग्य आहार न घेणे.
५. व्हिटॅमिन डी आणि कॉपर यांची कमतरता.
६. थायरॉईडची समस्या असणे
शाळकरी मुलांचे केस पांढरे होऊ नयेत म्हणून काय उपाय करावे?
१. कडिपत्त्यामध्ये लोह आणि इतर पौष्टिक घटक चांगल्याा प्रमाणात असतात. त्यामुळे कडिपत्ता कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रोज मुलांनी खायला हवा याकडे लक्ष द्या.
२. खोबरेल तेलामध्ये कडिपत्त्याची पाने घालून उकळा. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा मुलांच्या केसांना मालिश करा. केस पांढरे होणं बंद होईल आणि केसांची वाढही चांगली होईल.
आंबा घरीच पिकत घालण्याची बघा एकदम सोपी पद्धत, भुसा- पोते आणि पेटीचीही गरज नाही, आंबे पिकतील मस्त
३. बदाम आणि अक्रोड या पदार्थांमध्ये हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांना ते रोज खायला द्या.
४. मुलांच्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. ते पुरेशी झोप घेतील याची काळजी घ्या. दररोज सकाळी त्यांना कोवळ्या सुर्यप्रकाशात न्या जेणेकरून व्हिटॅमिन डी मिळेल.
५. दूध, दही, पनीर, तूप असे व्हिटॅमिन बी देणारे पदार्थ आणि लोहयुक्त पदार्थ नियमितपणे खायला द्या.
