दापोलीतील पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:43 IST2025-05-02T16:42:12+5:302025-05-02T16:43:51+5:30

दापोली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश साेडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नागरिकांचा ...

Pakistani women from Dapoli apply for Indian citizenship | दापोलीतील पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज 

दापोलीतील पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज 

दापोली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश साेडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नागरिकांचा शाेध घेण्यात येत असून, दापाेली तालुक्यात दाेन पाकिस्तानी महिलांचे वास्तव्य आहे. भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींशी त्यांचे लग्न झाले असून, त्यांनी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही.

यातील एक महिला तालुक्यातील हर्णै येथे, तर दुसरी दापोली शहरात राहत आहे. दोघींनीही लग्नानंतर पाकिस्तानचे नागरिकत्व रद्द केले आहे. त्यांच्याकडे पती-पत्नी म्हणून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पाउझ व्हिसाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली हाेती. मात्र, त्यांना ताे मार्चमध्ये पुन्हा मिळाला.

चार वर्षापूर्वीचे अर्ज

या महिलांना भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी चार वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला आहे. मात्र, त्यावर अद्याप काेणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांनी याबाबत पुन्हा चाैकशी केली असता, आठ दिवसांत ताे मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Pakistani women from Dapoli apply for Indian citizenship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.