Ratnagiri: टाळसुरेत घराला पाण्याचा वेढा; सहाजणांना वाचवले, खेम धरणात बेपत्ता एकाचा शोध सुरू
By मनोज मुळ्ये | Updated: July 8, 2024 14:22 IST2024-07-08T14:19:46+5:302024-07-08T14:22:02+5:30
दापोली : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बांधतिवरे येथे नदीला पूर आल्याने शेती ...

Ratnagiri: टाळसुरेत घराला पाण्याचा वेढा; सहाजणांना वाचवले, खेम धरणात बेपत्ता एकाचा शोध सुरू
दापोली : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. बांधतिवरे येथे नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील ताडील - कोंगळे येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. टाळसुरे येथे रविवारी रात्री अचानक एका घराला पाण्याने वेढा दिल्याने घरातील सदस्य अडकून होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला यश आले आहे.
दोन-तीन दिवस दापोली तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. रविवारी खेम धरणात पोहण्यासाठी गेलेला एक मुलगा बेपत्ता असून, अजूनही त्याचा शोध सुरू आहे. रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मौजे टाळसुरे येथील मेडिकल कॉलेज बस स्टॉपच्या पाठीमागे असलेल्या करमरकर कुटुंबाच्या यांचे घराजवळ पाणी भरले.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याची दखल घेऊन एकाच घरात राहणा-या दोन कुटुंबातील मयुरेश देविदास करमरकर (वय ३७), देविदास गणपत करमरकर (७४), प्रमिला देविदास करमरकर (६०), अजित नारायण जोशी (७२), अश्विनी अनुप जोशी (३५), अनय अनुप जोशी (६) या सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.