Ganpati Festival -कोरोनामुळे पीपीई कीट घालून भटजींनी सांगितली पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 14:03 IST2020-08-22T14:02:16+5:302020-08-22T14:03:11+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दापोली तालुक्यात भटजीने पीपीई कीट घालून भक्तांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे पसंत केले.

Ganpati Festival -कोरोनामुळे पीपीई कीट घालून भटजींनी सांगितली पूजा
ठळक मुद्देकोरोनामुळे पीपीई कीट घालून भटजींनी सांगितली पूजादापोली तालुक्यातील भटजीची नामी शक्कल
शिवाजी गोरे
दापोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दापोली तालुक्यात भटजीने पीपीई कीट घालून भक्तांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे पसंत केले.
गणरायाच्या पूजेसाठी घरोघरी भटजीला बोलावले जाते. मात्र, कोरोनामुळे कोणाच्या घरी जाणे धोक्याचे ठरत आहे. मग, पूजा सांगण्यासाठी जायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
दापोली तालुक्यातील भटजीने नामी शक्कल लढवत चक्क पीपीई कीट घालून भक्तांची इच्छा पूर्ण केली.