तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..? पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक अडगळीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:28 IST2026-01-01T14:28:02+5:302026-01-01T14:28:16+5:30
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या ...

तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..? पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक अडगळीत...
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात यापलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, अत्यंत टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभतुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.
प्रदूषण : वायू, जल प्रदूषणामुळे शहरातील नागरिक बेजार
प - नवेल महापालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास उद्भवत आहे. तळोजा येथील रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी कासाडी नदीमार्गे खारघर, कामोठे, तळोजे खाडीत सोडले जाते. या पाण्यामुळे उग्र दर्प येतो. विशेष म्हणजे मध्यरात्री काही कारखान्यांतून रासायनिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते. ग्रामीण भागातील रहिवासी वर्षानुवर्षे हा त्रास सहन करत आहेत. याशिवाय शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे सर्वत्र धूलिकण पसरत असून अनेकांना श्वसनाचा जाणवू लागला आहे. मात्र नव्याने वास्तव्यास आलेल्या शहरी भागातील रहिवासी या समस्यांवर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. नदी नाल्यांमधील रासायनिक प्रदूषणामुळे मोकाट गुरे, पशु-पक्ष्यांच्या जीवासही धोका उद्भवत असून याप्रकरणी पर्यावरणप्रेमींकडूनही आवाज उठवल्यात येत आहे.
पाणीटंचाई: मुबलक पाणीपुरवठा कधी मिळणार ?
श हराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शिलार, अमृत योजना टप्पा ३ सारख्या प्रकल्पांतून शेकडो एमएलडी पाणी पनवेल पालिका क्षेत्राला मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत पनवेल महापालिका क्षेत्राला २५८ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्याऐवजी २३० एमएलडी पाणी प्रत्यक्षात मिळत असल्याने अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावते. तब्बल २८ एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे खारघर, तळोजे, कामोठे, नवीन पनवेल, ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात अपुऱ्या पाणी पुरवठ्यास तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानिकांकडून सातत्याने मोर्चे, आंदोलने केली जातात. तरीही परिसरातील पाणीसमस्या सुटलेली नाही. त्यातच टैंकर लॉबीने नागरिकांची लूट सुरू केली आहे. २०३६ मध्ये हीच पाण्याची मागणी ५१७ एमएलडीवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे वेळेत नियोजित प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पार्किंग : वाहनतळाचा अभाव, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडी
अ रुंद रस्त्यांमुळे पनवेलमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होते. तालुक्याचे ठिकाण आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये, जिल्हा न्यायालय, महापालिका मुख्यालय, मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्या तुलनेत वाहनतळाचा अभाव शहरात जाणवतो. त्यामुळे अनेकजण रस्त्यालगत वाहने उभी करतात. शहरातील बहुतांश जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने रहिवाशी रस्त्यालगत, अंतर्गत मार्गावर वाहने उभी करतात. वाहनांची संख्या मोठी आणि पार्किंगचा अभावामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेने उभारलेल्या पार्किंग स्थळावर गाड्या उभ्या असल्याचे शहरात चित्र आहे. शहरात काही ठिकाणी सम-विषय पाकिंगची व्यवस्था असली तरी कोंडी सोडवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
फेरीवालेः प्रशासनाकडून धोरणाची अंमलबजावणी
म -हापालिका क्षेत्रात अद्याप फेरीवाला १ अंमलबजावणी झाली नसल्याने पनवे कळंबोली, कामोठे, तळोजे, खारघर, नः पनवेल सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्ता व्याप त्यामुळे नागरिकांना पदपथाचा वापर करता येत त्यांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण व्हावे लागते. पां अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. नजीकच्या आठवडा बाजार ही संकल्पना उदयास आली अ शहरात वेगवेगळ्या दिवसांनुसार बाजार भरवले आहेत. सिडकोने विभागनिहाय रोज बाजार उभा तरी बहुतांश फेरीवाले रस्त्यावरच बस्तान मांडून नागरिकांची गैरसोय होते.
तुमच्याही भागात असे काही प्रश्न असतील फोटोसह आम्हाला 9594057455 या नंबर पाठवा. तुमच्यासाठी आम्ही ते निवडणुकीचे