उरणमध्ये जुना साकव कोसळून दोन आदिवासी मजूरांचा मृत्यू, दोन इसम गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 22:57 IST2024-02-26T22:57:26+5:302024-02-26T22:57:34+5:30
या दुदैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उरणमध्ये जुना साकव कोसळून दोन आदिवासी मजूरांचा मृत्यू, दोन इसम गंभीर जखमी
मधुकर ठाकूर, उरण: उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील धुतुम- दादरपाडा दरम्यान रहदारीसाठी वापरात असलेला जुना साकव सोमवारी (२६) संध्याकाळी अचानक कोसळला.या कोसळलेल्या साकवाच्या सिमेंट कॉक्रीटच्या मलब्याखाली दुदैवाने दोन आदिवासी मजूर दगावले आहेत.तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या दुदैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील दादरपाडा - धुतुम दरम्यान हा जुना साकव आहे.९ फुटी लांब, ४ फुट रुंद आणि साधारणता आठ ते दहा फूट उंचीच्या या जुन्या साकवावरुन आदिवासी व वीटभट्टी ,शेतमजूर यांच्याकडून जास्त प्रमाणात येजा करण्यासाठी वापर केला जात आहे.या जुन्या साकवाखालुनही लहान होड्या ( डुंगी) येजा करतात.
सोमवारी संध्याकाळी ४.३० ते पाच वाजताच्या सुमारास हा जुना साकव कोसळला.या कोसळलेल्या साकवाच्या सिमेंट कॉक्रीटच्या मलब्याखाली दुदैवाने दोन आदिवासी मजूर दगावले आहेत.अविनाश सुरेश मिरकुटे (पेण )आणि राजेश लक्ष्मण वाघमारे (वरसई
करोटी) अशी मृतांची नावे आहेत.तर गुरुनाथ सदानंद कातकरी, सूरज शाम वाघमारे, रा. वेश्र्वीवाडी हे दोघे गंभीररीत्या जखमी आहेत.एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.आशी माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.तर मृतदेह साकवाच्या सिमेंट कॉक्रीटच्या मलब्याखालुन काढण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी दिली.