मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी लाँच सेवा आठ दिवसांनी पुर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 16:49 IST2023-06-17T16:49:12+5:302023-06-17T16:49:20+5:30
आठ दिवसांपासून बंद असलेल्या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.

मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी लाँच सेवा आठ दिवसांनी पुर्ववत
मधुकर ठाकूर
उरण : बिपरजॉयच्या भीतीमुळे आणि खराब हवामानामुळे तब्बल आठ दिवसांपासून बंद पडलेली जेएनपीए ,मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक शनिवारपासून (१३) पुर्ववत सुरू झाली आहे.
मागील आठ दिवसांपासून बिपरजॉयच्या भीती,वादळी हवामानामुळे आणि समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच उठणाऱ्या लाटांमुळे विविध बंदरात खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे- एलिफंटा , गेटवे -जेएनपीए ,मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती.
आठ दिवसांपासून बंद असलेल्या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. जेएनपीए ,मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शनिवारपासून पुर्ववत सुरू करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली. गेटवे- एलिफंटा सागरी मार्गावरील प्रवासी,पर्यटक वाहतूक उसळत्या लाटांमुळे बहुधा रविवार पासुन पुर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.