जेएनपीएच्या सेक्रेटरी, वरिष्ठ प्रबंधकपदी मनिषा जाधव यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 21:02 IST2023-05-12T21:02:13+5:302023-05-12T21:02:33+5:30
३४ वर्षात पहिल्यांदाच महिला विराजमान

जेएनपीएच्या सेक्रेटरी, वरिष्ठ प्रबंधकपदी मनिषा जाधव यांची नियुक्ती
मधुकर ठाकूर, उरण: जेएनपीएच्या सेक्रेटरी, वरिष्ठ प्रबंधकपदी मनिषा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंदराच्या ३४ वर्षातील कारकिर्दीत या पदी पहिल्यांदाच महिला विराजमान झालेल्या आहेत. याआधी जेएनपीएच्या पर्सनल व इंडस्ट्रीयल रिलेशन व्यवस्थापन पदी कार्यरत होत्या.मे अखेरीस जयवंत ढवळे हे सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.या रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी पदांची सुत्रे शुक्रवारी हाती घेतली आहेत.त्यांना अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आणि दूरध्वनी, भ्रमरध्वनीवरुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.