Vidhan sabha 2019 : विरोधकांनी राजकारण करून विश्वासघात के ला - अदिती तटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 02:52 IST2019-10-02T02:52:01+5:302019-10-02T02:52:39+5:30
विरोधकांनी केवळ जातीपातीचे राजकारण करून लोकांचा विश्वासघात केलाच, शिवाय गावागावांत वाद, कलह निर्माण केला, असे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी के ले.

Vidhan sabha 2019 : विरोधकांनी राजकारण करून विश्वासघात के ला - अदिती तटकर
म्हसळा : विरोधकांनी केवळ जातीपातीचे राजकारण करून लोकांचा विश्वासघात केलाच, शिवाय गावागावांत वाद, कलह निर्माण केला, असे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी के ले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी थेट मतदार संपर्क गाठण्यांवर अधिक भर देऊन श्रीवर्धन तालुक्यातील मेंदडी गणातील मेंदडी, वरवठणे गणातील केलटे, आणि आंबेत गणातील खामगाव येथे भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधला. या वेळी आयोजित सभेत अदिती तटकरे बोलत होत्या. याप्रसंगी तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.