मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 16:30 IST2023-12-27T16:29:01+5:302023-12-27T16:30:14+5:30
मच्छीमारांनी या कासवाला समुद्रात सोडले.

मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव
मधुकर ठाकूर,उरण : मासळी पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या एका दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीच्या कासवाला करंजा-कोंढरीपाडा येथील मच्छीमारांनी समुद्रात सोडून दिले.
करंजा गावातील कोंढरीपाडा येथील भारत हिराजी पाटील व त्यांचे सहकारी नेहमी प्रमाणे मंगळवारी (२६) समुद्रात आपली बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी गेले होते.त्यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी टाकले होते .थोड्या अवधीनंतर टाकलेले जाळे बोटीत खेचले . मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात मासळी ऐवजी भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे एक समुद्री कासव अडकून पडल्याचे आढळून आले. भारत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास कासव जाळ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होते. मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या कासवाची अलगदपणे सुटका केली. जाळ्यातुन बाहेर काढलेल्या दुर्मिळ समुद्री कासवाला लागलीच समुद्रात सोडून दिले.
हे दुर्मिळ कासव ग्रीनसी टरटल (Green sea turtle किंवा Olive redley या नावाने ओळखले जाते.या जातीची मादी वर्षांकाठी एका सिजनमध्ये दोन ते तीन वेळा घरटी बांधते आणि एकाच वेळी १०० अंडी देते असे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राणीमित्र विवेक केणी यांनी सांगितले.