महाडजवळ भीषण अपघात; भरधाव टॉइंग व्हॅनने सहा जणांना चिरडले, चार जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 11:25 IST2025-01-03T11:23:59+5:302025-01-03T11:25:05+5:30
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महाडजवळ भीषण अपघात; भरधाव टॉइंग व्हॅनने सहा जणांना चिरडले, चार जणांचा मृत्यू
महाड, प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री वीर रेल्वे स्टेशन जवळ उद्या असलेल्या सहा जणांना भरधाव गोइंग व्हॅनने जोरदार धडक देत चिरडत नेले. या भीषण अपघातामध्येमहाड मधील चौघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाड मधील काही तरुण माणगाव दिशेने जात असताना त्यांच्या वाहनातील डिझेल संपल्याने ते महामार्गालगत उभे होते. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या एका टोइंग व्हॅन क्रमांक एम एच १४ सी एम ३०९ ने उभ्या असलेल्या या सहा जणांना जोरदार धडक देत जवळपास पाच ते दहा फूट फरपटत नेले. हे सर्व जन त्यांच्या स्कॉर्पिओ ने जात होते. ही धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओ देखील जवळपास पन्नास फूट लांब फेकली गेली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. हे सर्व तरुण महाड शहरातील असल्याने महाड मधील धाव घेतली होती. मयत व्यक्तींमध्ये सूर्यकांत सखाराम मोरे रा. नवेनगर, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर रा. कुंभारआळी, समीप सुधीर मींडे रा. दासगाव यांचा समावेश आहे. तर सुरज अशोक नलावडे, शुभम राजेंद्र मातळ, या दोघांवर मुंबई येथे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.