पोलिसांच्या चार दिवसांच्या शोध कार्यानंतरही किंजल शहा बेपत्ताच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 21:23 IST2024-03-21T21:19:29+5:302024-03-21T21:23:48+5:30
मागील चार दिवसांच्या तपास कार्यानंतरही किंजलचा शोध लागलेला नाही.

पोलिसांच्या चार दिवसांच्या शोध कार्यानंतरही किंजल शहा बेपत्ताच
मधुकर ठाकूर, उरण : समुद्र,खाडी आणि किनारपट्टी भागात मागील चार दिवसांच्या शोध कार्यानंतरही अटलसेतुवरुन उडी घेतलेल्या ४३ वर्षीय महिला डॉक्टर किंजल शहा हिचा पोलिसांना शोध लागलेला नाही.
निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईतील डॉक्टर किंजल शहा यांनी अटल सेतूवरुन सोमवारी उडी घेतली होती.या महिलेचा न्हावा -शेवा पोलिस समुद्र परिसरात शोध घेत आहेत.पोलिसांनी समुद्र,खाडी आणि किनारपट्टी भाग सागरी सुरक्षा दल, मच्छीमारांच्या मदतीने पिंजून काढला आहे. मात्र मागील चार दिवसांच्या तपास कार्यानंतरही किंजलचा शोध लागलेला नाही.
समुद्राच्या ओहटीच्या वेगवान प्रवाहात किंजलने उडी मारली होती.त्यामुळे अथांग पसरलेल्या समुद्रात शोध घेण्यासाठी पोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.