सुट्टीचा आनंद घ्या; पण प्रथम मतदान करा; विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:59 AM2019-04-27T00:59:31+5:302019-04-27T00:59:57+5:30

पनवेल, उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान

Enjoy the holiday; But first make a poll; Appeal to Vijay Suryavanshi | सुट्टीचा आनंद घ्या; पण प्रथम मतदान करा; विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

सुट्टीचा आनंद घ्या; पण प्रथम मतदान करा; विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

Next

अलिबाग : सुट्टी परत परत येईल पण मतदानाची संधी पाच वर्षांनंतर येणारी आहे,त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमूल्य हक्क २९ एप्रिल रोजी बजावावा, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात समाविष्ट रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन विधानसभांमधील मतदारसंघातील एकूण ११ लाख ९ हजार २५० मतदारांना केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून एकूण २१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

पनवेल-उरणमधून आपण मुंबई-ठाण्यात नोकरी व्यवसायासाठी जाता,आपल्या कुटुंबातील तरुण आयटी, सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करतात, पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या भागाचे, मतदारसंघाचे पर्यायाने देशाचे भवितव्य ठरविण्याची ही सुवर्णसंधी सोडणे योग्य नाही. मतदानाचा दिवस ही सार्वजनिक सुट्टी आहे, पण या सुट्टीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावणे विसरू नका,असे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या पनवेल, उरण आणि पुण्याच्या जवळ असलेल्या कर्जत, खोपोली भागातील आपण सर्व मतदार सुजाण आहात, सुशिक्षित आहात. मतदानाचे महत्त्व आपणास ठाऊक आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपली ओळख सिद्ध करा आणि हा राष्ट्रीय महोत्सव साजरा करा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

मतदान ओळखपत्र नसले तरी मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी विविध अकरा कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. यामध्ये पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन वा राज्य शासन वा सार्वजनिक उपक्र म वा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्तांनी दिलेले ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांच्याकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन पासबुक किंवा पेन्शन पेमेंट आॅर्डर, आमदार वा खासदार यांचे ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. मतदारांना कोणतीही शंका असल्यास त्यांनी अधिक माहितीसाठी १९५० या हेल्पलाइनवर संपर्क करा किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळांना भेट द्या,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात ५८४, उरण विधानसभा मतदारसंघात ३३९ तर कर्जत विधानसभा मतदारसंघात ३४३ अशी एकूण १२६६ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये संपूर्ण महिला अधिकारी व कर्मचारी संचालित तीन सखी मतदान कें द्रे राहणार आहेत. केंद्र क्र मांक ३४४ पनवेल महानगरपालिका, केंद्र क्रमांक १६६ कर्जत ८, आणि केंद्र क्रमांक २२९ उरण ११ याठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी ही केंद्रे चालवतील. पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर १ मतदान केंद्राध्यक्ष, १ प्रथम मतदान अधिकारी व २ इतर मतदान अधिकारी असे एकूण ४ मतदान अधिकारी असतील. सर्व मतदान केंद्रांसाठी १० टक्के राखीव मतदान अधिकारी मिळून एकूण ५५९२ मतदान अधिकारी व कर्मचारी सज्ज करण्यात आले आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार
३३ मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, उरण आणि कर्जत या तीन मतदारसंघात मिळून ११ लाख ९ हजार २५० मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ७७ हजार १८० पुरु ष तर ५ लाख ३२ हजार ६७ महिला आणि ३ तृतीयपंथी मतदार आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघात ५ लाख ३९ हजार १८७, उरण विधानसभा मतदारसंघात २ लाख ९० हजार २७३ तर कर्जत विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ७९० मतदार आहेत. पनवेलमध्ये १७०, उरणमध्ये ४१ तर कर्जत ६३ असे एकूण २७४ सर्व्हिस व्होटर्स आहेत.

१९२ विविध पथके तैनात
२९ एप्रिल रोजी पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघात मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता होणाºया मतदान प्रक्रियेवर बारकाईने नजर ठेवून अनुचित प्रकार टाळण्यासाठी विविध प्रकारची एकूण १९२ पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये १३ स्थिर सर्वेक्षण पथके, २२ भरारी पथके, चार व्हिडीओ सर्वेक्षण पथके, १८ सूक्ष्म निरीक्षक पथके आणि १३५ झोनल अधिकारी पथके यांचा समावेश असून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

पनवेल-उरणमध्ये १३ संवेदनशील मतदान केंद्रे
पनवेल विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रे व उरण विधानसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. पनवेलमधील १० पैकी सात खारघरमधील आहेत. दरम्यान, उरण विधानसभा मतदारसंघातील गव्हाण येथील ५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
पुरेशी मतदान यंत्रे आणि वाहनांवर जीपीएस यंत्रणा
निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. एकूण राखीव यंत्रे मिळून बॅलेट युनिट्स २९१६, कंट्रोल युनिट्स १४५४ तर व्हीव्हीपॅट १५६८ असतील. ही मतदान यंत्रे ने-आण करणाºया वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉंनिटरिंग कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

१३२ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
मतदान केंद्रावरील कामकाज सातत्यपूर्ण संरक्षण निगराणीकरिता पनवेलमधील ५८, उरणमधील ३९ अणि कर्जतमधील ३५ अशा एकूण १३२ मतदान केंद्रांवरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. हे वेब कास्टिंग थेट भारत निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रण कक्ष यांच्याशी जोडण्यात आले आहे.

Web Title: Enjoy the holiday; But first make a poll; Appeal to Vijay Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.