महाड येथील चवदार तळ्यात सापडला राजेंद्र शेरेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:14 AM2019-08-03T01:14:01+5:302019-08-03T01:14:26+5:30

शहरात खळबळ : दोन तास सुरू होती शोध मोहीम

 The body of Rajendra Shere was found in the tomb of Mahad | महाड येथील चवदार तळ्यात सापडला राजेंद्र शेरेचा मृतदेह

महाड येथील चवदार तळ्यात सापडला राजेंद्र शेरेचा मृतदेह

Next

बिरवाडी : महाड शहरातील गवळ आळी परिसरात आपल्या नातलगांकडे राहून भाजीविक्रीचा व्यवसाय करणारा तरुण गुरुवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता. दिवसभरात सर्व ठिकाणी शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने चवदार तळ्याच्या पायरीवर सापडलेल्या त्याच्या सामानाच्या बॅगेचा आधार घेत, शुक्रवारी सकाळपासून भोई समाज व महाडमधील काही पट्टीचे पोहणारे तरुण यांची मदत घेऊन नातलगांनी महाड नगरपरिषदेच्या बोटीच्या साहाय्याने चवदार तळ्यात शोध मोहीम सुरू के ली होती.दोन तासांच्या प्रयत्नानंतर पाण्यात बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या तरुणाने चवदार तळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा का संपविली, हा प्रश्न अनुत्तरीत असून, या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

महाड शहरातील गवळ आळी येथील पानवाले वाडकर यांच्याकडे राहणारा व नात्याने मामेभाऊ असणारा मूळचा मंडणगड तालुक्यातील आदा या गावचा रहिवाशी राजेंद्र मधुकर शेरे (३५) हा तरुण शहरात हातगाडीवर भाजीविक्री करून आपला उदरनिर्वाह चालवीत होता. काही दिवसांपासून नगरसेवक बंटी पोटफोडे यांच्या प्रयत्नातून महाड एमआयडीसीतील कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाला होता. गुरुवार १ आॅगस्ट रोजी सकाळी घरातून नाश्ता करून आपली कामाची बॅग घेऊन राजेंद्र शेरे हा तरुण बाहेर पडला. मात्र, अकरा वाजण्याच्या दरम्यान काही जागरूक नागरिकांना चवदार तळ्याच्या पायरीवर एक बेवारस बॅग आढळून आल्याने व त्यात राजेंद्र शेरे यांचे ओळखपत्र सापडल्याने त्याचे नातलग व पोलिसाकडून शोध सुरू झाला. मात्र, दिवसभरात पोलीस व नातेवाईक यांना शेरे यांचा थांगपत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी चवदार तळ्यामध्येही या तरुणाच्या खाणाखुणा दिसून आल्याने, त्याचे नातलग वाडकर यांनी चवदार तळ्यातील पाण्यात शोध घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे युवा शहर अधिकारी सिद्धेश पाटेकर, नगरसेवक बंटी पोटफोडे यांच्या विनंतीवरून दासगावचे सरपंच सोन्या उकीर्डे यांच्या सहकार्याने स्वत: सरपंच सोन्या उकीर्डे दासगांवचे भोई समाजाचे पट्टीचे पोहणारे दीपक पड्याळ, उमेश निवाते, शेखर निवाते, प्रयोग निवाते यांना पाचारण करीत करंजखोल येथील राकेश मोरे महाडमधील मित डाखवे, अर्णव शेठ, महाड नगरपालिकेचे गणेश पाटील यांनी नगरपालिकेच्या बोटीच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर राजेंद्र शेरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. राजेंद्रच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून, महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title:  The body of Rajendra Shere was found in the tomb of Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.