कर्नलवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2025 20:15 IST2025-01-27T20:13:57+5:302025-01-27T20:15:21+5:30

भोर पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील घटना 

youth in karnalwadi attempts self immolation | कर्नलवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कर्नलवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नीरा : प्रजासत्ताक दिनी कर्नलवाडी गावातील युवकाने सासवडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंकुश उमाजी वाघापुरे (वय ३० वर्षे) रा. कर्नलवाडी, ता. पुरंदर याने दि. २६ जानेवारी रोजी सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. याबाबत दत्तात्रय शांताराम खेगरे पो.हवा. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

याबाबत सासवड पोलीस स्टेशन मध्ये  गु.र.नं.35/2025 भा.न्या.सं.कलम 125, 286, 35, 221कल्मांअन्वय दत्तात्रय शांताराम खेगरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ०८.४५ वाजताच्या सुमारास मौजे सासवड ता. पुरंदर जि. पुणे गावचे हददीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग सासवड यांचे कार्यालया समोरील मोकळया जागेत अंकुश उमाजी वाघापुरे याने कोणते तरी विषारी औषध प्राशन करून स्वताःचे व इतरांचे व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून मानवी जिवित धोक्यात येईल अशा पध्दतीने बेदरकारपणे विषारी पदार्थाबाबत कृती करून फौजदारी पात्र धाकधपटशहा करून इतर व्यक्तिंना भयभित करून शासकीय कामात अडथळा आणलेला आहे. म्हणून पो.हव. खेगरे यांनी वाघापूर यांच्या विरूध्द सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे. प्रभारी अधिकारी  पोलिस निरीक्षक ऋशषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गायकवाड गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

"मागील काळात माझ्यासह भावकितील इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक माझा त्या गुन्ह्यात काही संबंध नाही. त्यामुळे माझ्यावरील गुन्हे मागे घ्यावे म्हणून मी पोलीसांकडे वारंवार दाद मागत आहे. संबंधित व्यक्ती आजही मला शेतात त्रास देत आहेत. मला माझी शेती करुन देत नाहीत. याचा त्रास स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगितला. पण काही उपयोग झाला नाही त्यामुळे व्यथित होऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे."
अंकुश वाघापूरे

 

Web Title: youth in karnalwadi attempts self immolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.