Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:45 IST2025-12-02T15:44:33+5:302025-12-02T15:45:46+5:30
शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान
भोर: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शहरातील मतदारांकडून रांगेत शांतपणे मतदान सुरू असून सकाळी ७.३० ते १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के झाले आहे . शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशीमाहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांनी थंडीचे दिवस असले तरी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न होता मतदान प्रक्रिया सुरू असुन कार्यकर्त्यांची मतदारांना ने -आन करण्याची लगबग सुरू आहे. वयोवृद्ध तसेच अपंग मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून व्हीलचेअरची सोय केली आहे. उमेदवारांकडून खाजगी रिक्षा ,कार ,टू- व्हीलर यांची सोय करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने – आण करण्याची सोय करण्यात आलेली आहे सर्वच्या सर्व मतदान केंद्रा मोठी गर्दी केली आहे. बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी मतदारांनी मतदान केले असल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.
पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात जिल्ह्यातील १२ नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून ८.३७ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २०.२२ टक्के मतदान झाले होते. आता दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद ३५.६९ टक्के मतदान झाले आहे.