श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 23:09 IST2025-08-26T23:08:36+5:302025-08-26T23:09:37+5:30

भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे.

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Abhishek Seva register online | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा

अभिषेकासाठी नाव नोंदणीस सुरुवात

पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
  
गेल्या १३४ वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, उत्सवात श्री गणेशाची अभिषेक सेवा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आली नव्हती. मात्र, गेल्या दोन तीन वर्षापासून भाविकांकडून अभिषेक सेवा सुरु करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात सुरु होती. भाविकांच्या या मागणीचा मान राखत अखेर ट्रस्टने गतवर्षीपासून अभिषेक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि हिच परंपरा यंदाही पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार दहा दिवसांच्या उत्सव कालावधीत पहाटे ५ ते ११ या वेळेत भाविकांना बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे या श्री. गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊन अभिषेक करता येणार असल्याची माहिती उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली. त्यासाठी आधीच नाव नोंदणी करुन वेळ निश्चित करता येणार आहे.

ऐच्छिक अभिषेक करण्यासाठी भाविकांना http://bit.ly/abhishek2025 या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करता येणार असून नाव नोंदणीसाठी काही अडचण असल्यास ९०४९२३३०२९ किंवा ९८९०९९४१८२ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नाव नोंदणी करू न शकलेल्या भाविकांनाही अभिषेक करावयाचा असेल तर थेट उत्सव मंडपात नाव नोंदणी केलेल्या भाविकांचा अभिषेक झाल्यानंतर उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येणार आहे.  त्यासाठी इच्छुक भाविकांनी सोबत दिलेल्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून करण्यात आले आहे.
...

"भाविकांच्या मागणीनुसार गतवर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु केली आणि या सेवेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही ही 'ऐच्छिक अभिषेक सेवा' सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. यंदाही भाविकांकडून या सेवेचं स्वागत केलं जाईल आणि सेवेचा लाभही घेतला जाईल, असा विश्वास आहे."

- पुनीत बालन
उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.

 

Web Title: Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Abhishek Seva register online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.