'जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 04:06 PM2021-10-16T16:06:36+5:302021-10-16T16:39:55+5:30

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला (sharad pawar ed, ncb, income tax, modi government, nawab malik, bhavna gavli)

sharad pawar on central government bjp ed cbi income tax department | 'जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय'

'जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय'

Next

पुणे: जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे.केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज शरद पवारपिंपरी चिं

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. सध्या सीबीआय, आयकर, एनसीबी आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

- आरोप करणारे परमबीर सिंह आता कुठे गायब झाले?

- भाजपची सरकारे नसलेली राज्ये केंद्राकडून अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहेत.

- केंद्र राज्यावर, लोकप्रतिनिधींवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे.

- एनसीबीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

- मत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न.

- मलिकांनी केंद्राविरोधात मते मांडल्याने सुडबुद्धीने त्यांच्या जावयावर कारवाई.

- खासदार भावना गावित, अनिल परब, नवाब मलिक यांच्या विराधात यंत्रणांचा गैरवापर केला.

- केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे.

- केंद्रीय संस्थांना हाती धरून केंद्र सरकार दहशत पसरवत आहे.

- महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे काम केंद्र सरकार करतेय.

- गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे.

- शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

- शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

- ''मी येणारच...असे छाती ठोक पणे सांगणारे , ते काही आले नाही म्हणून राजकीय आकसाने चौकशी सुरू आहे.

- एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत येत आहे.

 - एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले की यंत्रणा लगेच कारवाई सुरू केले आहे, यावरून काय समजायचे?

- ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक संकटे आले, राज्य सरकारने कोरोना चे संकट योग्य पद्धतीने हाताळले

- आघाडी सरकार बनविण्यात माझा हात होता.

- मी सक्तीने उद्धव ठाकरे यांचा हात हातात घेऊन त्यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवलं.

- सत्ता गेल्याचे दुःख देवेंद्र फडणवीसांना जास्त आहे.

- महाविकास आघाडीचे नेतृत्त्व शिवसेनेकडे राहणार.

- आघाडी सरकार बनवण्यात माझाही हात होता. 

-

 

Web Title: sharad pawar on central government bjp ed cbi income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app