भोरमध्ये ऐतिहासिक राजवाड्यात साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव दुसऱ्यांदा रदद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 15:50 IST2021-04-21T15:23:09+5:302021-04-21T15:50:21+5:30
कोरोनामुळे राजवाडयात सर्वत्र शुकशुकाट

भोरमध्ये ऐतिहासिक राजवाड्यात साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव दुसऱ्यांदा रदद
भोर: भोर राजवाड्यात जय श्रीरामच्या जयघोषात साजरी होणारी श्रीराम नवमी यंदा दुसऱ्यांदा रद्द करण्यात आली आहे. सुमारे ३०० वर्षांपासून भोरच्या पंतसचिवांच्या संस्थानकालीन राजवाड्यात राम नवमी साजरी केली जात असे. त्यामुळे गर्दीने फुलून जाणाऱ्या या राजवाडयात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे.
भोरचे पंतसचिव मागिल ३०० वर्षापासून अखंडपणे श्रीराम नवमी भोरच्या राजवाडयात मोठया उत्साहात साजरी करत होते. यासाठी शहरासह तालुक्यातील नागरीक उत्सव पाहण्यास गदर्दी करत होते. माञ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागिल वर्षी रामनवमी उत्सव रदद केला होता. तर यावेळीही कोरोनाची दुसरी लाट आल्याने श्रीरामनवमी उत्सव रदद करण्यात आला आहे. तर भोरचे ग्रामदैवत जानाईदेवीची याञाही कोरोनामुळे याञा कमिटीने उत्सव रदद करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी कोरोनामुळे मंदिरे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यावरही बंदी आली होती. भाविकांना त्यावेळीही बंद दरवाज्यातून देवाचे दर्शन घ्यावे लागले. पुढच्या वर्षी उत्सव आनंदाने साजरा करण्याची त्यांना आशा होती. पण यंदा तर कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा पुन्हा एकदा खंडीत झाली आहे.