Pune: रिंग रोडसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १० हजार ५१९ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:55 AM2024-02-28T11:55:02+5:302024-02-28T11:56:01+5:30

रिंग रोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादन जानेवारीअखेर तर पूर्व भागाचे भूसंपादन मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत....

Provision of 10 thousand 519 crores in interim budget for ring road | Pune: रिंग रोडसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १० हजार ५१९ कोटींची तरतूद

Pune: रिंग रोडसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १० हजार ५१९ कोटींची तरतूद

पुणे :पुणे व पिंपरी शहराला भेडसावणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोड प्रकल्पासाठी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात सुमारे १० हजार ५१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोडचे काम झपाट्याने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. रिंग रोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादन जानेवारीअखेर तर पूर्व भागाचे भूसंपादन मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

रिंग रोडचा हा प्रकल्प सुमारे १३७ किलोमीटरचा असून त्यासाठी १ हजार ७०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ७ हजार ५०० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. रिंग रोडच्या पश्चिम भागासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये, तर पूर्वेकडील भागासाठी सुमारे ४ हजार ५०० हजार कोटी रुपये दिले जातील. रिंग रोडच्या पश्चिम भागासाठी आतापर्यंत सुमारे ६० टक्के भूसंपादन झाले असून त्यातील ६२४ हेक्टर खासगी क्षेत्र आहे. त्यापैकी ३३६.४० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. उर्वरित जमिनीचे संपादन सक्तीने केले जाणार असून त्यासाठी ६० दिवसांच्या मुदतीच्या नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर या क्षेत्राचे सक्तीने भूसंपादन पूर्ण करण्यात येईल.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सहा तालुक्यांतील सुमारे ८४ गावांतून जमीन संपादन करण्यात येत आहे. नवीन दरानुसार मोबदला निश्चिती करून पश्चिम भागासाठी मावळ, मुळशी, हवेली व भोर तालुक्यातील ३२ गावांतील संपादित करावयाच्या सुमारे ६४५ हेक्टर जमिनीपैकी ३०७ हेक्टर क्षेत्र संमतीने घेण्यात आले. उर्वरित क्षेत्राचे भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्यात येऊन प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचे पुण्याच्या विकासकामांविषयी आग्रही असून त्यांनी रिंगरोडसाठी केलेली १० हजार ५२९ कोटी रुपयांची तरतूद या कामाला अधिक गती देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Provision of 10 thousand 519 crores in interim budget for ring road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.