PMC Election 2026: पूर्व पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग ३ तर सुरेंद्र पठारे प्रभाग ४ मधून मैदानात

By किरण शिंदे | Updated: December 30, 2025 15:48 IST2025-12-30T15:48:02+5:302025-12-30T15:48:28+5:30

नेतृत्व विकास, महिलांचे स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यावर भर देणारे कार्यक्रम त्यांनी सातत्याने घेतले आहेत.

PMC Elections Highly educated couple from Pune in the election fray; Aishwarya Pathare from Ward 3 and Surendra Pathare from Ward 4 | PMC Election 2026: पूर्व पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग ३ तर सुरेंद्र पठारे प्रभाग ४ मधून मैदानात

PMC Election 2026: पूर्व पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग ३ तर सुरेंद्र पठारे प्रभाग ४ मधून मैदानात

पुणे - पूर्व पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून एक उच्चशिक्षित दांपत्य पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ऐश्वर्या पठारे आणि सुरेंद्र पठारे यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, दोघेही भारतीय जनता पक्ष कडून निवडणूक लढवणार आहेत. ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक ३ तर सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक ४ मधून मतदारांसमोर उभे राहिले आहेत.

सुरेंद्र पठारे हे उच्चशिक्षित असून पुण्यातील प्रतिष्ठित COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) येथून गोल्ड मेडलिस्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर पुण्यातील भाजप संघटन अधिक मजबूत झाल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम देवेंद्र’ला पूर्व पुण्यातून सक्षम, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व मिळाल्याची भावना पक्षात व्यक्त केली जात आहे. सुरेंद्र पठारे यांच्या माध्यमातून पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, सुरेंद्र पठारे यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांनीही प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित उद्योजिका असून सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार (२०१४) आणि फायनान्शियल टाइम्स बिझनेस अवॉर्ड (२०२२) ने त्या सन्मानित आहेत. सखी प्रेरणा मंच या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. नेतृत्व विकास, महिलांचे स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यावर भर देणारे कार्यक्रम त्यांनी सातत्याने घेतले आहेत.

वडगाव शेरी परिसरातील हजारो महिलांना एकत्र आणत ऐश्वर्या पठारे यांनी जेजुरी हरिद्रा मार्तंड पूजा हा उपक्रम राबवला होता. हा उपक्रम केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला असून, संपूर्ण वडगाव शेरीत त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. महिलांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमामुळे ऐश्वर्या पठारे यांची ओळख सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रभावी नेतृत्व म्हणून अधिक दृढ झाली आहे.

एकीकडे अभ्यासू, तांत्रिक पार्श्वभूमी असलेले सुरेंद्र पठारे आणि दुसरीकडे सामाजिक जाणीव व उद्योजकीय दृष्टिकोन असलेल्या ऐश्वर्या पठारे या दांपत्यामुळे पूर्व पुण्यातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उच्चशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून मतदार त्यांच्याकडे कसे पाहतात, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : शिक्षित दंपति भाजपा टिकट पर पुणे PMC चुनाव लड़ेंगे।

Web Summary : पुणे में भाजपा टिकट पर सुरेंद्र और ऐश्वर्या पठारे नामक एक उच्च शिक्षित दंपति PMC चुनाव लड़ रहे हैं। सीओईपी स्वर्ण पदक विजेता सुरेंद्र वार्ड 4 से चुनाव लड़ेंगे, जबकि ऐश्वर्या, एक उद्यमी और समाज सेविका, वार्ड 3 से चुनाव लड़ेंगी। उनके प्रवेश ने राजनीतिक चर्चाओं को जन्म दिया है।

Web Title : Educated Couple Contests PMC Elections from Pune on BJP Tickets.

Web Summary : A highly educated couple, Surendra and Aishwarya Pathare, are contesting PMC elections from Pune on BJP tickets. Surendra, a COEP gold medalist, will contest from ward 4, while Aishwarya, an entrepreneur and social worker, will contest from ward 3. Their entry has sparked political discussions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.