PMC Elections : महापालिकेच्या प्रारुप आरक्षण सोडतीला आयोगाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:57 IST2025-11-15T18:56:11+5:302025-11-15T18:57:27+5:30

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे.

PMC Elections Commission approves Municipal Corporation's draft reservation lottery | PMC Elections : महापालिकेच्या प्रारुप आरक्षण सोडतीला आयोगाची मान्यता

PMC Elections : महापालिकेच्या प्रारुप आरक्षण सोडतीला आयोगाची मान्यता

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रारूप आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. आता यानंतर आरक्षणावर येणाऱ्या हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर प्रभागांचे आरक्षण अंतिम होणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे.

या निवडणुकीसाठी मंगळवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये १६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. त्यानुसार ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक यासाठी प्रभागांची सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसींसाठी ४४ जागा राखीव आहेत. या सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. आरक्षणावर येणाऱ्या हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर प्रभागांचे आरक्षण अंतिम होणार आहे.

Web Title : पीएमसी चुनाव: राज्य चुनाव आयोग द्वारा मसौदा आरक्षण लॉटरी स्वीकृत

Web Summary : राज्य चुनाव आयोग ने आगामी चुनावों के लिए पुणे नगर निगम की मसौदा आरक्षण लॉटरी को मंजूरी दी। 41 वार्डों से 165 पार्षदों का चुनाव होगा, जिसमें 50% सीटें महिलाओं के लिए आरक्षित हैं। आरक्षण में एससी, एसटी और ओबीसी श्रेणियों के लिए सीटें शामिल हैं। आपत्तियों पर सुनवाई के बाद अंतिम आरक्षण निर्धारित किया जाएगा।

Web Title : PMC Elections: Draft Reservation Lottery Approved by State Election Commission

Web Summary : The State Election Commission approved Pune Municipal Corporation's draft reservation lottery for upcoming elections. 165 councilors will be elected from 41 wards, with 50% of seats reserved for women. Reservation includes seats for SC, ST, and OBC categories. Final reservations will be determined after hearing objections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.