PMC Elections 2026: ना घर, ना चारचाकी, ना महागडी दुचाकी..! या महिला उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त दोन हजार रुपयांची रक्कम.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:19 IST2026-01-04T14:19:35+5:302026-01-04T14:19:56+5:30
प्रभाग क्रमांक ३७ मधील अनेक उमेदवार कोटींहून अधिक मालमत्तेसह कोट्यधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत.

PMC Elections 2026: ना घर, ना चारचाकी, ना महागडी दुचाकी..! या महिला उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त दोन हजार रुपयांची रक्कम.
धनकवडी : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय ताकदीसोबतच उमेदवारांची आर्थिक क्षमताही चर्चेचा विषय ठरली आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून कोट्यधीशांचे राजकारण ठळकपणे समोर आले आहे.
प्रभाग क्रमांक ३७ मधील अनेक उमेदवार कोटींहून अधिक मालमत्तेसह कोट्यधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत तर दुसरीकडे एक महिला उमेदवाराच्या खात्यात अवघे दोन हजार रुपये असून नावावर ना घर, ना चारचाकी ना महागडी दुचाकी आहे, या महिला उमेदवाराचे नाव आहे.
तेजश्री भोसले, भोसले यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ही माहिती समोर आली आहे. सर्वाधिक संपत्ती अरुण राजवाडे यांच्याकडे असून त्याखालोखाल गिरीराज सावंत, वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, पंढरीनाथ खोपडे यांचा नंबर लागतो. या प्रभागात चार गटांत मिळून २७ उमेदवार रिंगणात आहेत, त्यामधील काही प्रमुख उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून कोट्यवधींची मालमत्ता उघड झाली आहे.
अरुण राजवाडे (भाजप) - ४९,२१,५८२१५/-
गिरीराज सावंत (शिंदेसेना) - १६,४५,९०३०३/-
वर्षा तापकीर (भाजप) - ६९,६५०००/-
मोहिनी देवकर (शिवसेना) - ६,१५,७५४५६/-
श्रद्धा परांडे (राष्ट्रवादी अजित पवार) - १,१३,३०,०००/-
किशोर धनकवडे - ६०,३२,०४७/-
तेजश्री बदक - ३,०७,९३, ०६२/-
विजय क्षीरसागर - २३,००,०००/-
कैलास भोसले - १,७२,३३४७१/-
पंढरीनाथ खोपडे - ३,३५,८०,५८३