PCMC Election 2026: उद्धवसेना-मनसे, काँग्रेस रंग भरणार; भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यात टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:06 IST2026-01-04T15:05:55+5:302026-01-04T15:06:19+5:30

दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी संघर्ष ; चिन्ह वाटपानंतर चित्र स्पष्ट

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Uddhav Sena-MNS, Congress will add color; Clash between BJP, both nationalists and Shinde Sena | PCMC Election 2026: उद्धवसेना-मनसे, काँग्रेस रंग भरणार; भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यात टक्कर

PCMC Election 2026: उद्धवसेना-मनसे, काँग्रेस रंग भरणार; भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यात टक्कर

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या चिन्ह वाटपानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यातील थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. काही प्रभागांत मात्र उद्धवसेना-मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारही करिष्मा करू शकतात, असे चित्र आहे.

शहरात दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत. दुरंगी लढतीत बहुसंख्य प्रभागांत मुख्यतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शिंदेसेना अशी थेट लढत होत आहे. तिरंगी लढतीत तीन पक्षांची थेट लढत रंगणार आहे. तेथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेसेना असे चित्र असेल. चौरंगी लढतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना, उद्धवसेनेच्या उमेदवारांसह अपक्षही रिंगणात आहेत. काही प्रभागांत बहुरंगी लढत होणार आहे.

दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढतीमुळे शहरातील निवडणूक उत्सुकता ताणणारी राहणार आहे. पुढील काही दिवसांत प्रचार, मतदारांचा प्रतिसाद आणि अपक्ष उमेदवारांचा दबाव निकाल निश्चित करतील.

---------

कोणत्या प्रभागात कशा लढती...

दुरंगी लढतींचे अपेक्षित प्रभाग

१ब, १क, २अ, २ब, २ड, ३ब, ३क, ३ड, ४ब, ४क, ५अ, ५ब, ६क, ६ड, ७अ, ७ब, ७क, ७ड, ८ब, १०क, १२ब, १५ब, १५क, १८अ, १९क, २१ब, २१ड, २४अ, २४ब, २४क, २४ड, २६अ, २६ब, २६क, २६ड, २७ब, २७ड, २८अ, २८ब, २८ड, २९अ, २९ब, २९क, २९ड.

--------

तिरंगी लढती होणारे अपेक्षित प्रभाग

१ड, २क, ४ड, ५क, ११ड, १२क, १२ड, १४क, १४ड, १६ब, १६क, १८ड, १९अ, २१अ, २१क, २२अ, २३ब, २३क, २५ब, २५ड, २७अ, २८क, ३०ब, ३१अ, ३१ब, ३१क, ३१ड, ३२अ, ३२क.

--------

चौरंगी लढती होणारे प्रभाग

१अ, ३अ, ४अ, ५ड, ६अ, ९ड, १०अ, ११क, १३ब, १३क, १४अ, १४ब, १५अ, १५ड, १६अ, १६ड, ३२ब, ३२ड, १७अ, १८ब, १८क, १९ब, १९ड, २०ब, २०क, २०ड, २२क, २२ड, २३ड, २५अ, २५क, २७क, ३०अ, ३०क, ३०ड.

-----------

बहुरंगी लढती होणारे प्रभाग

८अ, ८क, ८ड, ९अ, ९ब, ९क, १०ड, ११अ, ११ब, १२अ, १३अ, १३ड, १७ब, १७क, १७ड, २०अ, २२ब, २३अ.

Web Title : PCMC चुनाव 2026: प्रमुख दलों के बीच बहुकोणीय मुकाबले की उम्मीद।

Web Summary : पिंपरी-चिंचवड चुनाव में भाजपा, दोनों राकांपा गुट और शिंदे की शिवसेना सीधे प्रतिस्पर्धा करेंगे। बहुकोणीय मुकाबले की उम्मीद है, कुछ वार्डों में उद्धव सेना, मनसे और कांग्रेस संभावित रूप से परिणामों को प्रभावित कर सकते हैं।

Web Title : PCMC Election 2026: Multi-cornered fights expected between major parties.

Web Summary : Pimpri-Chinchwad elections will witness BJP, both NCP factions, and Shinde's Shiv Sena in direct competition. Multi-cornered fights are expected, with Uddhav Sena, MNS, and Congress potentially impacting results in some wards.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.