PCMC Election Results 2026 : पिंपरी मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी ‘फिफ्टी-फिफ्टी’ राहण्यामागची नेमकी राजकीय गणितं काय?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 18, 2026 17:21 IST2026-01-18T17:19:06+5:302026-01-18T17:21:16+5:30

भाजपची घोडदौड : भोसरीत ३५, चिंचवडमध्ये ३७; आमदार शंकर जगताप-महेश लांडगे यांच्या विधानसभा मतदारसंघात वर्चस्व; शहरातील १० प्रभागांत पूर्ण पॅनलची बाजी 

PCMC Election Results 2026: BJP-NCP 'fifty fifty' in Pimpri constituency; What is the real reason? | PCMC Election Results 2026 : पिंपरी मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी ‘फिफ्टी-फिफ्टी’ राहण्यामागची नेमकी राजकीय गणितं काय?

PCMC Election Results 2026 : पिंपरी मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी ‘फिफ्टी-फिफ्टी’ राहण्यामागची नेमकी राजकीय गणितं काय?

 लोकमत विश्लेषण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निकालातून शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांतील राजकीय पक्षांची ताकद स्पष्ट झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार शंकर जगताप, तर भोसरीत आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वर्चस्व राखले आहे. याउलट, पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी भाजपला निम्म्या जागांवर रोखण्यात यश मिळवले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात भाजपची सत्तेवरील पकड मजबूत झाली असली, तरी पिंपरीत राष्ट्रवादीचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील नेतृत्व, महापौरपद आणि सत्तावाटपाच्या राजकारणावर या विधानसभा मतदारसंघनिहाय निकालांचा प्रभाव राहणार आहे.

----------

भोसरीत काय घडले?

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ३५, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे १२, तर शिंदेसेनेचा एक उमेदवार विजयी झाला असून, अनेक प्रभागांमध्ये भाजपने एकतर्फी बाजी मारली. आमदार लांडगे यांच्या या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि आक्रमक प्रचाराचा फायदा निकालात दिसून आला. राष्ट्रवादीने प्रभाग १ आणि ९ मध्ये वर्चस्व सिध्द करुन दाखवले आहे.

------------

चिंचवडमध्ये काय झाले?

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मुसंडी मारली. येथून ३७ जागा खिशात घालत पक्षाने वर्चस्व अधोरेखित केले. येथे राष्ट्रवादीला १४ जागांवर समाधान मानावे लागले. शिंदेसेनेने प्रभाग २४ मध्ये दोन आणि प्रभाग १६ मध्ये तीन जागांवर विजय मिळवला आहे. चिंचवडमध्ये भाजपचा पारंपरिक मतदार आणि विरोधकांची मतविभागणी याचा फायदा पक्षाला झाला.

-------------

पिंपरीत काय घडले?

पिंपरी विधानसभा मतदारसंघात चित्र वेगळे राहिले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे हे ‘होम पीच’ आहे. त्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. मतदारसंघात राष्ट्रवादीने महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपला धक्का देत ताकद कायम ठेवली. पिंपरीत भाजपचे १२ उमेदवार विजयी झाले असून, उर्वरित १२ जागांवर राष्ट्रवादीने मोहोर उमटवली आहे.

----------------

या प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी...

भाजपने शहरातील १२ प्रभागांमध्ये पूर्ण पॅनल जिंकत ताकद दाखवली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २, ३, ४, ६, १० आणि ११, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १५, तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २५, २६ आणि २९ या प्रभागांमध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. काही प्रभागात दोन-तीन जागांवर भाजपला मताधिक्य मिळाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ९ आणि २०, २१ या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे पूर्ण पॅनेल निवडून आले.

------

विधानसभा मतदारसंघनिहाय भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या

मतदारसंघ - एकूण प्रभाग- एकूण नगरसेवक संख्या - भाजप - राष्ट्रवादी - शिंदेसेना

भोसरी - १२ -४८ - ३५ - १२ -०१

पिंपरी - ७- २८ - १३ -१५-००

चिंचवड - १३ - ५२ - ३७-१०-५

Web Title : PCMC चुनाव 2026: पिंपरी में भाजपा-राकांपा का पचास-पचास, कारणों का विश्लेषण।

Web Summary : PCMC चुनावों में, भाजपा का भोसरी और चिंचवड में दबदबा रहा। लेकिन, पिंपरी में राकांपा के अन्ना बनसोडे ने सीटें बांटते हुए अपनी पकड़ बनाए रखी। विधानसभा-वार परिणाम सत्ता की गतिशीलता को प्रभावित करेंगे।

Web Title : PCMC Election 2026: BJP-NCP's fifty-fifty split in Pimpri, reasons analyzed.

Web Summary : In PCMC elections, BJP dominated Bhosari and Chinchwad. However, in Pimpri, NCP's Anna Bansode held ground, splitting seats. Assembly-wise results will influence power dynamics.