Naad Ganesh: पुण्यात येत्या रविवारी रंगणार ‘नाद गणेश’; नाट्यसंगीत, भक्तिसंगीताचा आविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:07 IST2023-09-21T16:03:52+5:302023-09-21T16:07:35+5:30
लोकमत ‘ती’चा गणपती आयोजित रसिकांसाठी विनामूल्य सांगीतिक पर्वणी : पुनीत बालन ग्रुप आणि न्याती ग्रुपच्या सहयोगाने उपक्रम

Naad Ganesh: पुण्यात येत्या रविवारी रंगणार ‘नाद गणेश’; नाट्यसंगीत, भक्तिसंगीताचा आविष्कार
पुणे : कला आणि विद्यांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव मंगळवारपासून सुरू होत आहे. गणरायाला स्वराभिषेक करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे रविवारी (दि.२४) ‘नाद गणेश’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत व न्याती ग्रुपच्या सहयोगाने आयोजित लोकमत ‘ती’चा गणपती बाप्पा संकल्प सिद्धीचा या उपक्रमांतर्गत ‘नाद गणेश’ या बहारदार सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
पं. शौनक अभिषेकी, विदुषी मंजूषा पाटील, आर्या आंबेकर, अनिरुद्ध जोशी हे सुप्रसिद्ध गायक या रचना सादर करणार असून, अनय गाडगीळ या कार्यक्रमाचे संगीत संयोजक आहेत. या कार्यक्रमाला नीलेश परब हे तालवाद्याची साथ देणार असून, अमर ओक हे बासरीची साथ करणार आहेत. यासोबतच मंदार गोडसे, तन्मय पवार, आदित्य आठवले, अभिजित भदे, यश भंडारे आदी संगीतसाथ करणार आहेत. श्री गणेशाच्या प्रसिद्ध रचना, भक्तिसंगीत, नाट्यसंगीताचा सुमधुर आविष्कार या कार्यक्रमात अनुभवता येईल. खत्री बंधू पॉट आईस्क्रिम, स्वीटनेस पार्टनर काका हलवाई स्वीट्स, व प्रतीक कॉपर, मनोहर सुगंधी-सुगंधी पार्टनर, पीएनजी 1832 ज्वेलरी हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
कधी - २४ सप्टेंबर, संध्या. ५.०० वा.
कोठे - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल, कर्वेनगर
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध होतील
- लोकमत शहर कार्यालय, व्हिया वेन्टेज, १ ला मजला, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड
- काका हलवाई स्वीट सेंटर, कर्वे पुतळ्यासमोर सारथी सक्सेस स्क्वेअर, एरंडवणे शॉप नंबर १, अलंकार पोलिस चौकीजवळ.
चितळे आइस्क्रीमसमोर टिळकरोड, सदाशिव पेठ, आयुर्वेद रसशाळेसमोर कर्वे रस्ता.
एरंडवणे शॉप - शॉप नं. ६, अलंकार पोलिस चौकीजवळ, आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वेनगर
- लोकमत वडगाव : सर्व्हे नं. ३४ / अ वडगाव खुर्द, सिंहगडरोड, पुणे
- खत्री बंधू पॉट आइस्क्रिम व मस्तानी
- विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर
- शिवाजी पुतळा चौक, कोथरूड,
- गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगडरोड.
- वनाज कंपनीसमोर, कोथरूड,
- पीएनजी एक्सक्ल्युजिव्ह : निसर्ग हॉटेल लेन, नळस्टॉप