Municipal Election 2026: अन्यथा तुमचे मत बाद ठरेल! जाणून घ्या, यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:31 IST2026-01-13T11:29:30+5:302026-01-13T11:31:27+5:30
Municipal Election 2026 यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली असून तुमचे १ मत नाही, तर ४ मते शहराचे नगरसेवक निवडून आणणार

Municipal Election 2026: अन्यथा तुमचे मत बाद ठरेल! जाणून घ्या, यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे?
पुणे: राज्यात २९ महापालिकांच्या मतदान आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला सकाळपासून मतदान सुरु होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून पक्षांचा प्रचारही थांबणार आहे. यंदाच्या मतदान प्रक्रियेत बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. नागरिकांना एका प्रभागातून ४ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच ४ वेळा बटन दाबावे लागणार आहे. ही मतदान प्रक्रिया कशी असणार आहे? हे जाणून घेऊयात!
मतदान कसे करावे?
तुमचे एक मत नाही, तर ४ मते नगरसेवक निवडून आणणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.
* अ गट : पांढरा रंग (White)
* ब गट : फिकट गुलाबी रंग (Light Pink)
* क गट : फिकट पिवळा रंग (Light Yellow)
* ड गट : फिकट निळा रंग (Light Blue)
असे चार गट ईव्हीएम मशीनवर देण्यात आले आहेत. त्या गटामध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यापुढे मतदान करण्याचे बात देण्यात आले आहे.
मतदान प्रक्रिया : स्टेप-बाय-स्टेप
- प्रत्येक जागेसाठी (अ, ब, क, ड) उमेदवारासमोरील बटण दाबा.
- बटण दाबल्यानंतर त्या जागेसाठी लाल दिवा (Light) लागेल.
- ‘ड’ जागेचे मतदान झाल्यानंतर लांब ‘बजर’ वाजेपर्यंत थांबा.
महत्वाची सूचना : चारही जागांसाठी मतदान केल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अन्यथा तुमचे मत बाद ठरेल.
(उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध आहे.)