Maharashtra election 2019: Today I can be elected from all the ten constituencies in Kolhapur | Maharashtra election 2019 :आज कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदारसंघातून मी निवडून येऊ शकतो़   

Maharashtra election 2019 :आज कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदारसंघातून मी निवडून येऊ शकतो़   

पुणे : माझा जन्म मुंबईतील़ मी मुंबईतून कोल्हापूरला गेलो होतो़. तेथेही मला प्रारंभी विरोध झाला. पण मी काम करीत राहिलो़. त्यामुळे आज कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदारसंघातून मी उभा राहून निवडून येऊ शकतो़,  असे वक्तव्य  कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले़. पाटील यांच्या संकल्पनामाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, माझा जन्म मुंबईतील़ मी मुंबईतून कोल्हापूरला गेलो होतो़.  तेथेही मला प्रारंभी विरोध झाला पण मी काम करीत राहिलो़.  त्यामुळे आज कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदारसंघातून मी उभा राहून निवडून येऊ शकतो़. कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही तसेच होईल़. मी पुण्याला ८२ सालापासून जोडला गेलेलो आहे़.  १२ वर्षे पुणे पदवीधर मतदार संघातून प्रतिनिधीत्व करीत असून, गेल्या तीन वर्षापासून पुण्याचा पालकमंत्री म्हणून काम करीत असल्याने येथील प्रश्नांची मला जाण आहे़. 

पुढे ते म्हणाले की, कोथरूडमधील कामांचा संकल्पनामा ही सुरूवात आहे़.  कोथरूडच्या विकासासाठी या कामांमध्ये अनेक गोष्टी जोडल्या जातील़.  संकल्पना हा स्वल्पविराम आहे, तो पूर्णविराम नाही़. कोथरूडची वाढ होत असताना पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत़.  भविष्याचा विचार करून आता शहर नियोजन केले जाईल, तथा हे करीत असताना बांधितांना योग्य नुकसानभरपाईही दिली जाईल़.  पुण्याला आरक्षित पाणी देऊन चोवीस तास पाणी पुरवठा करणे हे माझे प्रथम काम राहणार आहे़ तसेच वाहतुक समस्येवर मात करण्यासाठी मेट्रोचे सुरू असलेले काम जलद गतीने करून, शहरात प्रदुषणमुक्त ई-व्हेयिकल याव्यात याकरिता प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले़.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra election 2019: Today I can be elected from all the ten constituencies in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.