Maharashtra Election 2019 : निवडणूक आयोगाची नामी शक्कल; उंच फुगे लावून केले मतदानाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:17 AM2019-10-21T11:17:50+5:302019-10-21T11:18:30+5:30

Maharashtra Election 2019 : आज राज्याच्या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे.

Maharashtra Election 2019 : Election Commission's Appeal to vote with high balloons | Maharashtra Election 2019 : निवडणूक आयोगाची नामी शक्कल; उंच फुगे लावून केले मतदानाचे आवाहन

Maharashtra Election 2019 : निवडणूक आयोगाची नामी शक्कल; उंच फुगे लावून केले मतदानाचे आवाहन

googlenewsNext

पुणे : आज राज्याच्या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. हळूहळू नागरिक घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी यंदा निवडणूक आयोगाने नामी शक्कल लढवली आहे. आकाशात उंच फुगे लावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभेला पुणे शहरातील मतदान पन्नास टक्यांच्या आत झाले होते. विद्येचे माहेरघर म्हंटल्या जाणाऱ्या पुण्यातच नागरिकांनी मतदानाविषयी अनास्था दाखवली होती. त्यामुळे विधांनसभेला मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी आता जिल्हा प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी मोठ मोठे फुगे हवेत सोडले आहेत. त्यावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस होत आहे. आज सकाळ पासून शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारनंतर शहरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Election Commission's Appeal to vote with high balloons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.