विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:14 IST2024-12-07T09:12:56+5:302024-12-07T09:14:02+5:30

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तब्बल २३७ मतदारसंघांतील उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी घराण्याचे वारस (ज्यांची पूर्वपीठिका आमदार, खासदार असल्याची आहे अशी घराणी) होते.

maharashtra assembly election 2024 Even in the assembly elections, family rule continues in the state Out of 288 candidates, 237 are from inheritance | विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

पुणे : राज्यातील राजकारणात घराणेशाहीचे वर्चस्व असल्याचा आरोप कायमच होत आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास करून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही कायमच असल्याचे सिद्ध केले आहे. 

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तब्बल २३७ मतदारसंघांतील उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी घराण्याचे वारस (ज्यांची पूर्वपीठिका आमदार, खासदार असल्याची आहे अशी घराणी) होते. भाजपने १४९ जागा लढवल्या, त्यातील ४९ उमेदवार वारसाहक्काने आलेले होते. काँग्रेसने १०१ जागा लढवल्या, त्यातील ४२ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ८६ जागा लढवल्या, त्यातील ३९ उमेदवार, अजित पवार गटाच्या जागा होत्या ५९ व त्यातील २६ उमेदवार हे घराणेशाहीतील होते. उद्धवसेनेने ९५ लढवल्या, १९ आल्या, शिंदेसेनेने ८१ लढवल्या, १९ आल्या अशी ही आकडेवारी आहे.

लंके, काळेंची सुरुवात 

 खासदार नीलेश लंके यांचे. प्रस्थापितांच्या विरोधात मतदारांना त्यांनी लोकसभेला खासदार केले, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लगेचच त्यांनी आपल्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. वर्धा येथील खासदार अमर काळे यांनीही तेच केले आहे. घराणेशाहीतही संघर्ष असून, काका पुतण्यांमध्ये तर तो आहेच, पण वडील- मुलगी (अहेरी), सख्खे भाऊ (सावनेर), पती-पत्नी (कन्नड) असेही एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसते.

मतदारांनीही स्वीकारली घराणेशाही 

पुणे : राज्यातील राजकारणात घराणेशाहीचे वर्चस्व असल्याचा आरोप कायमच होत आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास करून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी याही निवडणुकीत सर्वच १०१ जागा लढवल्या, त्यातील ४२ त्यांनी लोकसभेला खासदार केले, मात्र • या निवडणुकीत २८८ जागांपैकी घराणेशाहीच्या जागा होत्या २३७ व १ त्यातील ८९ जागा जिंकल्या गेल्या. ही आकडेवारी दिसायला कमी दिसत असली तरी त्याचे कारण यंदाचा निकाल हे आहे, मतदारांनी घराणे नाकारले हा त्याचा अर्थ नसल्याचे हेरंब कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. 

• महायुतीचे ९४ उमेदवार घराणेशाहीतील होते, तर आघाडीचे १००. इतर म्हणजे अपक्ष निवडणूक लढणाऱ्यांमध्येही ४३ उमेदवार वेगवेगळ्या राजकीय घराण्यांमधलेच होते असे त्यांनी म्हटले आहे. घराणेशाहीचे राज्यातील विभागनिहाय उमेदवार याप्रमाणे होते. पश्चिम महाराष्ट्र ७७, मराठवाडा-३९, खानदेश-३८, विदर्भ- ४९, मुंबई कोकण- ३४.

Web Title: maharashtra assembly election 2024 Even in the assembly elections, family rule continues in the state Out of 288 candidates, 237 are from inheritance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.