डोक्यात वार करून डॉक्टर पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 07:17 IST2021-09-07T07:17:21+5:302021-09-07T07:17:42+5:30
सरला पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे.

डोक्यात वार करून डॉक्टर पत्नीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (जि. पुणे) : तलाठी असलेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डॉक्टर असलेल्या पत्नीचा चाकूने वार करून, तसेच डोक्यात हातोडीने मारून निर्घृण खून केला. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सरला विजय साळवे (३२), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर विजयकुमार साळवे असे आरोपी पतीचे नाव आहे. सरला भंडारा जिल्ह्यातील तर विजयकुमार हा गोंदिया जिल्ह्यातील आहे. २०१९ मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला होता. सरला पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे.
पोलिसांना मिळाली चिठ्ठी
विजयकुमार याला पत्नी सरला यांच्या चारित्र्यावर संशय होता. घटनास्थळी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. ती मला साथ देत नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा, अशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली.