बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:57 PM2021-09-05T12:57:55+5:302021-09-05T12:58:06+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे

Bappa Moraya! Sale of '1.5 lakh' Modaks on the first day of Ganeshotsav in Pune | बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री

बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री

Next
ठळक मुद्देहातवळणीच्या उकडीच्या मोदकांना नागरिकांची खास पसंती

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : गणेशोत्सवातगणपतीला पारंपरिक पद्धतीने उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे. हातवळणीच्या उकडीच्या मोदकांच्या माध्यमातून घरगुती व्यवसायाला चालना मिळत आहे. पुण्यातील सुगरणींच्या मोदकांचा प्रवास ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे. शहरात दहा हजारांहून अधिक महिला, तसेच पुरुषही मोदकांच्या व्यवसायात असून यातून दरवर्षी एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाजे दीड लाख मोदकांची शहरात विक्री होते.

पुण्यातून फ्रोजन मोदकांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गूळ, नारळ, वेलदोडा, खसखस यांचे सारण आणि तांदळाची उकड यापासून तयार केलेले हातवळणीचे उकडीचे मोदक उणे १८ डिग्री सेल्शिअसमध्ये ‘ब्लास्ट फ्रिजिंग’ पद्धतीने साठवले जातात आणि वाहतूकही याच तापमानात केली जाते. फ्रोजन मोदक एक वर्ष टिकू शकतात. एका मोदक ११ ते १३ पाऱ्यांचा असून त्याचे वजन ६० ते ७० ग्रॅम असते आणि त्याची किंमत साधारणपणे २५-३० रुपये असते. मराठवाडा, विदर्भामध्ये तळणीच्या मोदकांना जास्त पसंती दिली जाते, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी ‘लोकमत’ला दिली.
 
हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना नागरिकांची खास पसंती 

''हातवळणीच्या उकडीच्या मोदकांच्या माध्यमातून घरगुती व्यवसायासाठी उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण झाले आहे. हातवळणीचे मोदक अत्यंत कौशल्याचे आणि सरावाचे काम असते. पती, पत्नी, मुले, घरातील ज्येष्ठ नागरिक असे सर्व कुटुंब मिळून या व्यवसायाला हातभार लावतात. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत पुण्यात मोदकांची सर्वाधिक विक्री होते. त्यासाठी आदल्या दिवशी रात्रभर जागरण करून ऑर्डर पूर्ण केल्या जातात. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून मागणी १० टक्क्यांपर्यंत कमी होते. गौरी जेवणाच्या दिवशी २०-२५ टक्के मागणी असते. गेल्या २० वर्षांपासून आपण महिलांना हातवळणीच्या उकडीच्या मोदकांचे प्रशिक्षण देत आहोत. यावर्षी ३५० महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. पुरुषांचाही या व्यवसायात सहभाग असतो. असं महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितलं.''

Web Title: Bappa Moraya! Sale of '1.5 lakh' Modaks on the first day of Ganeshotsav in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.