'आप'ची १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, तुमच्या प्रभागातील व्यक्तीचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:40 IST2025-12-23T18:39:08+5:302025-12-23T18:40:38+5:30
आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे

'आप'ची १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, तुमच्या प्रभागातील व्यक्तीचे नाव
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ‘आप’चे राज्याचे प्रभारी आणि दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल यांच्या उपस्थितीत राज्याचे कार्याध्यक्ष अजित फाटके-पाटील यांनी १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मंगळवारी (दि. २३) पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे, सचिव सुभाष कारंडे, राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्दत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर आम आदमी पार्टीने काल दुसरी यादी जाहीर केली असून या यादीमध्ये आलिशा हारून मुलानी- प्रभाग क्र. १ (क) ओबीसी महिला, स्मिता सोंडे- प्रभाग क्र. २ (अ) अनुसूचित जाती महिला, माधुरी रवर वडमारे- प्रभाग क्र. ३ (क) सर्वसाधारण महिला, सचिन खंकाळ- प्रभाग क्र. ४ (अ) अनुसूचित जाती, अनिकेत गागडे- प्रभाग क्र. १५ (ड) सर्वसाधारण, स्वप्नील विठ्ठलराव गोरे- प्रभाग क्र. १६ (ड) सर्वसाधारण, अरुण शिंदे- प्रभाग क्र. १७ (ड) सर्वसाधारण, इरफान रोडे- प्रभाग क्र. २२ (ब) ओबीसी सर्वसाधारण, शेखर शिवाजी ढगे- प्रभाग क्र. २२ (ड) सर्वसाधारण, इक्बाल रसूल तांबोळी- प्रभाग क्र. २३ (ड) सर्वसाधारण, पीयूष सुनील हिंगणे- प्रभाग क्र. २६ (ड) सर्वसाधारण, सूरज सोमनाथ सोनवणे- प्रभाग क्र. २७ (अ) अनुसूचित जाती, प्रदीप अर्जुन उदागे- प्रभाग क्र. २९ (ड) सर्वसाधारण, प्रतीक खोपडे- प्रभाग क्र. ३६ (ड) सर्वसाधारण, मानल शांताराम नाडे- प्रभाग क्र. ३९ (अ) अनुसूचित जाती महिला, निखिल विलास खंदारे- प्रभाग क्र. ४० (अ) अनुसूचित जाती यांचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिका निवडणूक 'आप'ने स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आजपर्यंत ४१ उमेदवार जाहीर केले असून, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, प्रदूषण आणि पारदर्शक कारभार हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत. पुण्यात पक्षाचे संघटन गेल्या दोन-तीन वर्षांत वाढले असले, तरी इतर प्रमुख पक्षांच्या तुलनेत मर्यादित आहे. सध्या 'आप'चा महापालिकेत एकही नगरसेवक नाही. मात्र आगामी निवडणुकीत किमान काही जागांवर खाते उघडण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.