Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:02 IST2025-12-02T17:01:31+5:302025-12-02T17:02:51+5:30

दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे.

51 percent voting in Pune district till 3.30 pm | Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

पुणे : राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आज जिल्ह्यात मतदान सुरु आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. या निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सकाळच्या पहिल्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरु होते. ११ नंतर काही चांगला प्रतिसाद मिळू लागला. पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात जिल्ह्यातील १२ नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून ८.३७ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २०.२२ टक्के मतदान झाले होते. आता दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे.  

तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरुण, ज्येष्ठ नागरिक उत्साहाने मतदान करताना दिसून येत आहेत. उद्या मतदानाचा निकाल लागणार होता. परंतु २१ तारखेला मतमोजणी होणार असल्याने बऱ्याच उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. मतदानानंतर लवकरच निकाल पाहण्याची त्यांची इच्छा होती. परंतु तो आता लांबणीवर गेल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे ग्रामीण भागातून दिसून आले आहे. 

नगरपरिषद मतदान टक्केवारी 

जुन्नर- ४७.१९, राजगुरूनगर - ५३.४४, चाकण - ५७.६४, आळंदी - ५९.३३, शिरूर - ४१.७८, दौंड - ४०.३०, इंदापूर - ६०.४१, जेजुरी - ६०.०३, सासवड - ५४.२८, भोर - ५८.३१ , लोणावळा - ५५.८६, तळेगाव दाभाडे -३६.५७

नगरपंचायत मतदान टक्केवारी 

मंचर - ६१.७५, माळेगाव - ६१.७५, वडगाव मावळ - ५९.७६

Web Title : पुणे जिले में दोपहर 3:30 बजे तक 51% मतदान

Web Summary : पुणे जिले में नगर पालिका और नगर पंचायत चुनावों में दोपहर 3:30 बजे तक 51% मतदान हुआ। शुरुआत में मतदान धीमा था, लेकिन बाद में गति पकड़ी। मतगणना 21 दिसंबर को होगी। नतीजों में देरी के बावजूद मतदाताओं ने उत्साह दिखाया।

Web Title : Pune District Civic Polls: 51% Voter Turnout Till 3:30 PM

Web Summary : Pune district saw 51% voting in municipal and Nagar Panchayat elections by 3:30 PM. Polling was slow initially but picked up pace. Counting will occur on December 21st. Voters showed enthusiasm despite the delayed results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.